‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत कायमच विविध ट्वीस्ट पाहायला मिळतात. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. नुकतंच त्यांनी मालिकेबद्दल खास आठवण शेअर केली आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिषेक आणि अनघा यांची मुलगी जानकी ही हळूहळू मोठी होत आहे. याच निमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी तिचा एक गोड व्हिडीओही पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”
मिलिंद गवळी यांची पोस्ट
““त्विशा “ म्हणजेच आमच्या “आई कुठे काय करते “ या मालिके मधलं छोटसं पिल्लू “जानकी” अगदीच काही महिन्याची असताना ती आमच्या सिरीयल मध्ये आली, अगदी एखाद्या घरामध्ये लहान बाळ जन्माला येतं, तसंच सगळ्यांना वाटतं .. आणि आपल्या घरामध्ये कसं लहान मुलाच्या खाण्यापिण्याच्या झोपायच्या वेळा सगळं सांभाळल्या जातात, तसंच त्विशाच्या बाबतीतही अगदी तसंच सगळं पाळलं जातं, मधेच एखादा असिस्टंट धावत यायचा कि त्विशा आता उठली आहे, आता ती छान खेळते आहे, मग बाकीचे जे शूटिंग चालू असायचं ते थांबून तिच्या सिनच शूटिंग सुरू करायचं,
तिचीही सेटवरच्या सगळ्यांची ओळख झाली असल्यामुळे सगळ्यांकडे ती छान पद्धतीने रमते, महिन्यात न एखाद दोन दिवस तिथे शूटिंग असायचं, आणि त्यादिवशी सेटवर एक वेगळच चैतन्य पसराचं, बहुतेक सगळेच प्रौढ, लहान मुलासारखं बोलायला लागायचे, आणि ज्या सिन मध्ये ती असेल तो सिन कसा होईल हे कोणालाच ठाऊक नसायचं, कारण ती ज्या पद्धतीने ते करेल तिच्या mood असेल त्या पद्धतीनेच ते शूटिंग व्हायचं, सिरीयल मध्ये माझ्या वाटेला तीचे सिन फार कमी आले आहेत, पण ज्या ज्या वेळेला ते आले त्या त्या वेळेला मला तो सीन करायला खूपच मजा आली, आपण शूटिंग करतो असं वाटायचं नाही लहान मुलाबरोबर लहान मुलासारखा आपण खेळतोय असंच वाटायचं, खरंतर अनिरुद्ध देशमुख ला ह्या गोष्टींची फार गरज असते.
पण काल त्विशा बरोबर माझा सीन होता, आणि हल्ली ती ज्या पद्धतीने धावते पळते एका जागेवर स्वस्त बसत नाही, अख्या सेट भर ती फिरत असते, कधी कधी तिला कडेवर घेऊन बसवावं लागतं, काल अचानक तिचे “आई कुठे काय करते” मध्यले सुरुवातीचे दिवस आठवले आणि लक्षात आलं की एक वर्ष निघून गेलं , आणि कसं ते कोणाला कळलच नाही, परवा परवा पर्यंत रांगत होती मग चालायला शिकली आणि आता चक्क धावते….
लहान बाळा परमेश्वराचे रूप असतात असं म्हणतात ते काय खोटं नाही, तिला उदंड आयुष्य यश आरोग्य आनंद सुख समृद्धी सर्व काही मिळो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना..”, असे मिलिंद गवळी यांनी यात म्हटले.
आणखी वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष
दरम्यान मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.