मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेले काही दिवस अभिनयाबरोबरच स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यास प्राधान्य देत आहेत. अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या मुलाने सुरु केलेल्या रेस्टॉरंटची अलीकडे चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलानेदेखील ठाण्यात स्वत:चा व्यवसाय सुरु केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता यामध्ये ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता निरंजन कुलकर्णीचा समावेश झाला आहे.

हेही वाचा : १८ वर्षांनी तमन्ना भाटियाने का मोडला ‘नो किसिंग पॉलिसी’चा नियम? अभिनेत्री खुलासा करीत म्हणाली…

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Pune Railway Station in 1965
१९६५ मध्ये पुणे स्टेशन कसं होतं? VIDEO एकदा पाहाच
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

अभिनेता निरंजन कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुधंतीच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारत असून त्याने अभिनयाबरोबरच ठाण्यात स्वत:चा कॅफे सुरु केला आहे. निरंजनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. निरंजन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो त्यामुळेच आपल्या चाहत्यांना त्याने कॅफेमध्ये चहा प्यायला आमंत्रित केले आहे. सध्या त्याचा नव्या कॅफेमध्ये चहा बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करीत अभिनेत्याला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “विकी-कतरिनासह आलिया करतेय गॉसिप?” एअरपोर्टवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “रणबीरची तक्रार…”

निरंजन सोशल मीडियावर चहा बनवतानाचा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहितो, “रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा…कधी येताय प्यायला?” यावर अनेकांनी “लवकरच…” अशा प्रतिक्रिया देत अभिनेत्याचे कौतुक केले आहे. अभिनेत्याने ठाणे घोडबंदर परिसरात सुरु केलेल्या या कॅफेचे नाव ‘बडिज सॅंडविच’ असे आहे.

दरम्यान, सध्या निरंजन कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुधंतीच्या मोठ्या मुलाची म्हणजेच अभिषेकची भूमिका साकारत आहे. गेल्यावर्षी ‘सोल कढी’ या लघुपटाच्या माध्यमातून निरंजनने नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले होते.

Story img Loader