मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून राधिका देशपांडेला ओळखले जाते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत राधिकाने अरुंधतीच्या मैत्रिणीचे म्हणजे देविकाचे पात्र साकारले होते. त्याबरोबरच ती सध्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. नुकतंच तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिका देशपांडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने भगवान श्री रामांच्या एका मूर्तीचा फोटो पोस्ट केला आहे. याबरोबरच तिने या मूर्तीमागील कहाणीही सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगली चर्चेत आहे.
आणखी वाचा : “लग्न आहे आमचं, छान झालंय डेकोरेशन…”; प्रसाद जवादेने अमृता देशमुखसाठी घेतला हटके उखाणा

राधिका देशपांडेची पोस्ट

“काल इंस्टा कनेक्ट मैत्रिणीला सोलापूरला भेटले. तिने श्री रामाची मूर्ती माझ्या साठी आणली. माझ्या घरी रामाची ही पहिली मुर्ती. गेले एक महिना मी मैथिली ठाकूरच गाणं “मेरी झोपड़ी के भाग आज जाग जायेंगे राम आयेंगे।” गुणगुणते आहे. योगायोग असा की मृण्मयीच्या घरी रामाचं मंदिर आहे आणि रामनवमी मधे नऊ दिवस मोठ्ठा कार्यक्रम असतो. दिवाळीच्या दिवस आणि राम घरी येणे निव्वळ योगायोग समजावा का आणखीन काही?

“सियावर रामचंद्र की जय” ह्या नाटकाचा प्रयोग लवकरच प्रेक्षकाच्या भेटीस येईल. तेव्हा ह्या मूर्ती चे दर्शन घ्यायला नक्की या”, असे राधिका देशपांडेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मुलांना इतिहास शिकवायचा असेल तर…”, शिवकालीन किल्ल्यांविषयी मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, “आताच्या आळशी…”

राधिका देशपांडेच्या या पोस्टवर मृण्मयी राऊतने कमेंट केली आहे. “धन्यवाद राधिका ताई. ती मूर्ती तुला मिळावी ही श्री प्रभू रामचंद्रांचीच इच्छा. तुला तुझ्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. नाटक पाहायला आम्ही सगळे नक्की येऊ”, अशी कमेंट मृण्मयीने केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kute kay karte fame marathi actress radhika deshpande gift shri ram idol share special post nrp