स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. पण काही दिवसांसाठी मधुराणीने या कार्यक्रमामधून ब्रेक घेतला होता. आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अरुंधती मालिकेमध्ये पुन्हा परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘आई कुठे काय करते’मध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेमधील आप्पा यांचा अपघात झाला असल्याचं दाखवण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच कोलमडलं आहे. मालिका एका रंजक वळणावर असताना अरुंधतीची एंट्री कशी झाली नाही? असा प्रश्न प्रेक्षक विचारत होते.
मालिकेच्या या नव्या वळणावर अरुंधती ‘आई कुठे काय करते’मध्ये पुन्हा काम करताना दिसणार आहे. तिने मध्यंतरी एक पोस्ट शेअर करत मालिकेमधून ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं होतं. “माझी एक छोटी सर्जरी झाली असल्या कारणाने आहे. त्यामुळे मालिकेतूनही काही दिवसांची रजा मी मागून घेतली. मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे आणि लवकरच मी मालिकेतून तुम्हाला पुन्हा भेटेन.” असं मधुराणीने सांगितलं.
आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”
सर्जरीमधून पूर्णपणे बरी झाल्यानंतर अरुंधती तिच्या कामाला लागली आहे. मालिकेमध्ये अरुंधतीची एंट्री होणार म्हटल्यावर प्रेक्षकही फार खूश आहेत. पण आता अरुंधतीच्या येण्याने मालिकेमध्ये कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणंही रंजक ठरेल.