आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. नुकत्याच एका मुलाखतीत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या व्यसनाबाबत विधान केलं आहे.

हेही वाचा- “…म्हणून मी नाटकांमध्ये काम करत नाही”; प्रार्थना बेहरेने सांगितलं कारण, म्हणाली “सततची बेचैनी अन्…”

chandrakant patil replied to rohini khadse
“मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही”, चंद्रकांत पाटील यांचे रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर!
aamir khan mahatma Gandhi
आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट
lokrang article
पडसाद : नेत्यांनी आपल्या भावना वैयक्तिक ठेवाव्यात
sunil tatkare on amol mitkari warning
“पूर्ण माहिती घेऊनच बोला”, ‘त्या’ विधानावरून सुनील तटकरेंनी टोचले अमोल मिटकरींचे कान; म्हणाले, “काही लोक जाणीवपूर्वक…”
anil deshmukh on devendra fadnavis resign
“माझी भाजपाच्या नेतृत्वाला हात जोडून विनंती आहे; त्यांनी फडणवीसांना…”; अनिल देशमुखांचं विधान चर्चेत!
What Sushma Andhare Said?
सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “दिवसाढवळ्या वसईत तरुणीची हत्या होते आणि लोक बघत राहतात, हे…”
NCERT Director Dinesh Prasad Saklani
‘मुलांना दंगलीचे शिक्षण का द्यायचे?’ NCERT च्या पुस्तकातून अयोध्या वाद गाळल्यानंतर संचालकांचे उत्तर
Hindutva organization trimbakeshwar marathi news
त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रमाणपत्र, अंनिसचा आक्षेप; दुकानदारांची नाराजी

एका मुलाखतीत मिलिंद गवळी यांना विचारण्यात आलं होतं की चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांना व्यसन लागतात तुम्हाला कोणतं व्यसन आहे का? या प्रश्नाच उत्तर देत मिलिंद गवळी म्हणाले, “मी एक नंबरचा व्यसनी आहे. पण मला अभिनयाचं व्यसन आहे. व्यसानासाठी केमिकल घेण्याची गरज नाहीये. या केमिकलच्या व्यसानांनी तुमच्या शरीराच नुकसान होतं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच नुकसान होतं. मला सिगरेट पिणाऱ्या लोकांचा प्रचंड राग येतो. ऑक्सिजन सोडून ते कार्बनडायऑक्साईड घेत असतात. पण तुम्ही जर नियमित प्राणायम केलं तर तुम्हाला व्यसनांची गरज नाही.”

गवळी पुढे म्हणाले, “लोक मोबाईला सगळ्यात जास्त जपतात. आयफोन असेल तर त्याची जास्त काळजी घेतात. पण देवाने आपल्याला शरीर नावाची जी देणगी दिली आहे त्याची कुणी काळजी घेत नाही. लोकांची सध्याची जीवनशैली पाहता येत्या काळात मानसरोगतज्ञांना जास्त मागणी असेल मला वाटतं”

हेही वाचा- “मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेतला कारण…”, ‘उंच माझा झोका’तील छोट्या रमाने केला खुलासा, म्हणाली, “त्या मालिकेमुळे…”

दरम्यान मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.