‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून राधा सागरला ओळखले जाते. या मालिकेत राधाने ‘अंकिता’ हे पात्र साकारले होते. आता राधा सागर खऱ्या आयुष्यात आई झाली आहे. राधा सागरच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधा सागरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राधाने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्या नवऱ्याचा, तिचा आणि तिच्या बाळाचा हात दिसत आहे.
आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी

याला कॅप्शन देताना राधा सागर म्हणाली, आणि हा आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण. आम्हाला मुलगा झाला. तो खरोखरच चमत्कारिक आहे. जीवनाच्या या नव्या मालिकेत आम्हाला आई आणि बाबा म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही खरोखरच धन्य झालो.

आणखी वाचा : Video : जिनिलीया देशमुख पुन्हा गरोदर? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

दरम्यान राधा सागर आई झाल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. राधाने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतला. या काळात तिने करिअरपासून ब्रेक घेतला. आता प्रसूतीनंतर ती तिच्या बाळाच्या संगोपनावर भर देणार आहे, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte actress radha sagar blessed with baby boy share instagram post nrp