‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर अभिनेत्री कौमुदी वलोकरची लग्नीनघाई सुरू झाली. २२ डिसेंबरपासून कौमुदीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा कौमुदीचा पाहायला मिळाला. २७ डिसेंबरला कौमुदीने आकाश चौकसे यांच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या दोघांच्या लग्नातील फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्यातल्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील अभिषेक देशमुखची पत्नी अभिनेत्री कृतिका देवने कौमुदीच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक, कृतिकाच्या सोबतीला अनिश म्हणजे सुमंत ठाकरे डान्स करताना दिसत आहे. कौमुदीच्या संगीत सोहळ्यात तिघांनी ‘झूम बराबर झूम’ या गाण्यावर डान्स केला आहे. तिघं जबरदस्त डान्स करताना दिसत असून याचं वेळी उपस्थितीत सर्वजण ओरडून, टाळ्या वाजून तिघांना प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – The Sabarmati Report OTT Release: आता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कुठे, कधीपासून जाणून घ्या…

हेही वाचा – Video: नमक इश्क का…; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याच्या पत्नीचा बिपाशा बासूच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

अभिषेक, कृतिका आणि सुमंतच्या डान्स व्हिडीओवर कौमुदीने प्रतिक्रिया दिली आहे. “लव्हली परफॉर्मन्स”, अशी प्रतिक्रिया कौमुदीने या व्हिडीओवर दिली आहे. तसंच “खूप सुंदर त्रिकुट”, “जबरदस्त परफॉर्मन्स”, “कडक…तुम्ही भारी डान्स केला आहे. मस्त त्रिकुट”, “खूप सुंदर”, “मस्त” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

कौमुदीचा नवरा काय करतो?

कौमुदी वलोकरचा नवरा आकाश चौकसे हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. कौमुदीचा नवरा UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसंच त्याची स्वतःची वेबसाइट आहे. ज्यावर त्याने अनेक ब्लॉग लिहिले आहेत. याआधी आकाशने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाइलवर ‘आरोहीचा खरा यश’ असं लिहिलं होतं. पण आता त्याने प्रोफाइल बदललं आहे.

हेही वाचा – Video: ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने भावाच्या लग्नात आजीबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर केलेला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, कौमुदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शाळेत असल्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame abhishek deshmukh dance with wife krutika deo and sumant thakare in kaumudi walokar sangeet ceremony pps