‘बिग बॉस मराठी’ फेम, ‘पुण्याची टॉकरवडी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री अमृता देशमुख हिने अभिनेता प्रसाद जवादेबरोबर लग्नगाठ बांधली. काल दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा संपन्न झाला. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत अन् मग सप्तपदी असे लग्न समारंभ अमृता आणि प्रसादचे पाहायला मिळाले. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण काल पार पडला. या बहुचर्चित लग्नातचे काही खास फोटो अमृताचा भाऊ अभिनेता अभिषेक देशमुखने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमृता आणि प्रसादचे सुत बिग बॉसच्या चौथ्या पर्वात जुळले. या पर्वातली दोघांची केमिस्ट्री चांगलीच गाजली. आता हीच केमिस्ट्री सत्यात उतरली आहे. अमृता आणि प्रसादने लग्नबंधनात अडकून आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. लग्नामध्ये दोघं पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाले. अमृताने गुलाबी रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचं सौंदर्य अक्षरशः खुललं होतं. प्रसादने धोतर, सदरा आणि टोपी असा मराठमोळा लूक केला होता. दोघांचा लग्नातला पारंपरिक लूक चांगलाच लक्षवेधी ठरला. सध्या सोशल मीडियावर दोघांचे लग्नातले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

हेही वाचा – “बहिणीची काळजी घे…”, अभिषेक देशमुखने कानपिळीदरम्यान प्रसादला बजावले, उत्तर देताना अभिनेता म्हणाला “तू जितकी…”

नुकताच अमृताचा भाऊ म्हणजे ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेता अभिषेक देशमुखने बहिणीच्या लग्नातचे काही खास क्षण शेअर केले आहेत. हे खास क्षण शेअर करत त्याने लिहीलं आहे की, अमृता… खूप, खूप आनंद, प्रेम आणि शुभेच्छा.

अभिषेकच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी अमृता आणि प्रसादला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही जणांनी त्याला विचारलं आहे की, ‘तुझी ही बहिणी आहे का?’

हेही वाचा – Video : मराठमोळा लूक, फुलांची उधळण अन्…; अमृता देशमुख-प्रसाद जवादेचा शाही विवाहसोहळा पडला पार, पाहा लग्नाचा खास व्हिडीओ

दरम्यान, प्रसाद अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अमृता पुण्याची टॉकरवडी म्हणून प्रसिद्ध आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर तिने रेडिओ जॉकी म्हणून प्रवास सुरू केला. याशिवाय प्रसाद जवादेने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं असून शेवटचा तो ‘काव्यांजली’ मालिकेत झळकला होता.