Aai Kuthe Kay Karte: मराठी मालिकाविश्वातील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचा अविरत मनोरंजन केलं. महाराष्ट्राच्या घराघरात ही मालिका पोहोचली. या मालिकेतील कलाकारांनी आपापली पात्र उत्तमरित्या निभावली. त्यामुळे आज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांना त्यांच्या पात्रांवरून अधिक ओळखलं जातं. आता ही लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार चर्चेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१९ नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शेवटचं चित्रीकरण पार पडला. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. या मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर भलीमोठी भावुक पोस्ट लिहिली आहे.
अभिषेक देशमुखने समृद्धी बंगल्याबाहेरील फोटो शेअर करत लिहिलं आहे, “गूड बाय यश अरुंधती देशमुख…’आई कुठे काय करते’च्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस…२०१९ ते २०२४…१४९१ भाग…पॅकअप! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं, पाच वर्षांपासून सोबत असलेलं ‘कुणीतरी’ आता कधीच नसेल किंवा असेल यातली घालमेल घरी येईपर्यंत होती…निघताना भेटीगाठी झाल्या, आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं…कुणाला तरी भेटायचं राहिलंय असं वाटतच होतं…शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो, मेकअप रूममध्ये, आरशात बघून आलो…पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो…बॅग जराशी जड वाटत होती…निरोप घेताना ‘मी’ समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की ‘तो’ माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक…त्याच्याकडे पाठ करून निघावसं वाटत नव्हतं.”
पुढे अभिषेकने लिहिलं की, “मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार…त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे”, असं शहाण्यांना वाटत असेल…पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं…‘यश’ने मला भरभरून प्रेम दिलं…ओळख दिली…अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक, आपलेपणा, आशीर्वाद उर्जा देणारे होते…टीव्ही या माध्यमाची ताकद काय असू शकते याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते…आईच्या भोवती फिरणारं यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल याची खात्री आहे, कारण आई मुलाचं/मुलीचं नातं वैश्विक असतं.
“हे करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या प्रोजेक्ट हेड आणि लेखिका नमिता वर्तक यांचा ऋणी असेन…नमिता तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं..त्याच बरोबर आमचे निर्माते राजन शाही यांचे खूप खूप आभारी आहे… तसंच सर्वात मोठा आभारी स्टार प्रवाहचा…सतीश राजवाडे, आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर, सुबोध बरे, तुषार विचारे, रोहित पाटील आमचे डीओपी राजू देसाई, राजेश मोहीते, एडिटर, कला दिग्दर्शक, आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले, चित्रा पाटणकर-गाडगीळ, तुषार जोशी आणि अरुंधतीपासून जानकीपर्यंत सगळे कलाकार,” अशी सुंदर पोस्ट अभिषेक देशमुखने लिहिली आहे.
दरम्यान, अभिषेक देशमुखच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री कौमुदी वलोकर, अश्विनी महांगडे, अमृता देशमुख, अर्चना पाटकर, सीमा घोगळे, अद्वैत कडणे अशा अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.