काल दिग्गज मराठी अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं, त्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झालं आहे. मिलिंद यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मिलिंद सफई यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय. मिलिंद यांनी पोश्टर बॉईज, छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्ट, टार्गेट, मेकअप व थँक यू विठ्ठला यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर करत मिलिंद सफईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
मिलिंद यांना कॅन्सर होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. मिलिंद सफई यांना मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.
First published on: 25-08-2023 at 15:16 IST
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame actor milind safai passed away hrc