Aai Kuthe Kay Karte Fame Actress Apurva Gore New Business : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरांत लोकप्रिय झालं आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा आघाडीवर होती. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एकीकडे मालिका निरोप घेणार असल्याची चर्चा असतानाच या मालिकेतील एका अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte ) मालिकेत अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका अभिनेत्री अपूर्वा गोरे साकारत आहे. अभिनय क्षेत्र सांभाळून वैयक्तिक आयुष्यात तिने मोठा निर्णय घेत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सर्वांची लाडकी ईशा आता बिझनेसवुमन झाली आहे. मात्र, अपूर्वाने कपड्यांच्या किंवा हॉटेल क्षेत्रात पदार्पण न करता एक आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आहे.

हेही वाचा : आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन

‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वाचा नवीन व्यवसाय

अपूर्वाने ‘Raahat’ या नावाने कँडल्सचा म्हणजेच मेणबत्ती विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे. पण, अपूर्वाने बनवलेल्या कँडल्स या साध्या नसून त्या विशिष्टप्रकारे डिझाइन केलेल्या आहेत. मोतीचूर लाडू, फुलांचा आकाराच्या अशा वैविध्यपूर्ण डिझाइन्सच्या कँडल्स तयार करून अभिनेत्री व्यवसाय करते.

अपूर्वाने तिच्या नव्या व्यवसायाचं नाव व लोगो असलेली पोस्ट शेअर करत “आयुष्यातील कठीण काळात आपल्याला सर्वांना एक सकारात्मक प्रकाश हवा असतो. यासाठी तुम्हा सर्वांबरोबर एक खास गोष्ट शेअर करतेय… तर, हा आहे माझा नवीन ब्रँड ‘Raahat’ By अपूर्वा” अभिनेत्रीने बनवलेल्या अनोख्या कँडल्स अगदी खरेखुरे मोतीचूर लाडू तर नाहीत ना असा गैरसमज अनेकांचा होतोय. त्यामुळे तिच्या अनोख्या कौशल्याचं सर्वजण विशेष कौतुक करत आहेत.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”

अपूर्वाने बनवलेल्या मोतीचूर लाडवासारख्या दिसणाऱ्या कँडल्स ( Aai Kuthe Kay Karte Fame Actress Apurva Gore New Business )

मधुराणी प्रभुलकर, अश्विनी महांगडे, अश्विनी कासार, सीमा घोगळे, गौरी कुलकर्णी या अभिनेत्रींनी ( Aai Kuthe Kay Karte ) कमेंट्स करत अपूर्वाला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame actress apurva gore starts new business of candles netizens praises her sva 00