स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीच कायमच टॉप १० मध्ये पाहायला मिळते. या मालिकेतील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायमच चर्चेत असते. नुकतंच अश्विनी महांगडेने एक मालिका संपत असल्याचे सांगितले आहे.

अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच अश्विनी महांगडेने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची मालिका संपल्याबद्दल भावूक पोस्ट शेअर केली आहे. ‘मेरे साई’ असे या मालिकेचे नाव आहे. ही एक हिंदी मालिका होती. आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून त्याबद्दलच तिने पोस्ट शेअर केली.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
husband sets car on fire wife dies
पत्नीला तिच्या मित्राबरोबर कारमध्ये पाहिलं, पतीने पाठलाग केला अन् पेट्रोल टाकून कार पेटवली, महिलेचा होरपळून मृत्यू
Tharala Tar Mag Fame Jyoti Chandekar fainted on set
सेटवर बेशुद्ध झाले, २ महिने मालिकेतून ब्रेक अन्…; ‘ठरलं तर मग’च्या पूर्णा आजीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, लेखिका म्हणाल्या…
punha kartvya aahe
पुन्हा कर्तव्य आहे: आकाश आणि वसुंधराचं नातं मोडलं! प्रोमो पाहून प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

अश्विनी महांगडेची पोस्ट

“मेरे साई…… (अप्रतिम अनुभव)

परवा या हिंदी मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून या मालिकेने समारोप केला. मी साधारण 1 वर्ष या मालिकेचा भाग होते. तसे पाहता ही माझी पहिली हिंदी मालिका. खरे तर शब्द उच्चाराचे, पाठांतर होईल न, मला जमेल न अशा अनेक गोष्टींचे दडपण हे होतेच. मी प्रयत्न केले. #तेजस्वी ला मी स्वीकारले आणि तिने मला.
@dashami_official ची आभारी आहे की मला एवढी मोठी संधी दिली. @kul_aanand thank you so much..
या मालिकेचे दिग्दर्शक @sachinambre005
सर thank you.
@siddhav21 thank you so much.
तसे पाहता निर्मिती संस्था, सहकलाकार, लेखक, संकलन विभाग, रंगभूषा, केशभूषा,
वेशभूषा @salekarrohini, संगीत विभाग, स्पॉट बॉईज आणि रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत सगळेच किती आणि कसे आभार मानायचे.
मी कायम ऋणी राहीन”, असे अश्विनी महांगडेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

दरम्यान अश्विनी ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबरोबरच ‘मेरे साई’ या मालिकेत झळकत होती. या मालिकेतील तिच्या पात्राचे कौतुक केले गेले. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.

Story img Loader