स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे अनघा नावाचे पात्र साकारते. या मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रंही खूप लोकप्रिय आहेत. अनघा म्हणजे अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

अश्विनीने इन्स्टाग्रामवर एक सुंदर स्टोरी शेअर केली आहे. “जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तितकं सुख नाही बोलत, सुख माणसाला मुकं बनवतं”, असं त्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे.

ashvini
अश्विनी महांगडेची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, अश्विनीच्या एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ‘मेरे साई’ असे या मालिकेचे नाव आहे. ही एक हिंदी मालिका होती. ही मालिका संपली आहे. याबाबत अश्विनीने इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे.

Story img Loader