‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ अलीकडेच बंद झाली. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या निभावल्यामुळे घराघरात पोहोचल्या. आज मालिका संपली तरीही कलाकार मात्र अजूनही चर्चेत आहेत. लवकरच ‘आई कुठे काय करते’मधील आरोही म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिचा ग्रहमख विधी पार पडला. त्याचे फोटो कौमुदीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
२०२३च्या वर्षा अखेरीस कौमुदी वलोकरने चाहत्यांना सुखद धक्का दिला. ३१ डिसेंबर २०२३ला कौमुदीचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून कौमुदीच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता लवकरच कौमुदी बोहल्यावर चढणार आहे.
हेही वाचा – Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
गेल्या काही दिवसांपासून कौमुदी वलोकरच्या केळवणाचे फोटो पाहायला मिळत होते. नुकताच तिचा ग्रहमख विधी पार पडला आहे. तिने स्वतःचं ग्रहमख विधीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ग्रहमख विधीसाठी कौमुदीने मस्टर्ड कलरची साडी नेसली होती. ज्यावर चंद्रकोरची डिझाइन आहे. तसंच या सुंदर साडीवर तिने मोजके दागिनी परिधान केले होते आणि गजरा घातला होता. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत कौमुदीचा ग्रहमख सोहळा पार पडला.
कौमुदीच्या ग्रहमख विधीला अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि शशांक केतकरची बहीण दीक्षा केतकर पाहायला मिळाली. एका फोटोमध्ये अश्विनी आणि दीक्षा कौमुदीला तयार होण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. ग्रहमख विधीसाठी नेसलेली साडी अश्विनी महांगडेने कौमुदीला गिफ्ट म्हणून दिली होती.
हेही वाचा – Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
कौमुदीचा होणारा नवरा कोण आहे? काय करतो?
कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाशने याआधी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाइलवर ‘आरोहीचा खरा यश’ असं लिहिलं होतं. पण आता त्याने प्रोफाइल बदललं आहे. आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. कौमुदीचा होणारा नवरा UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसंच त्याची स्वतःची वेबसाइट आहे. ज्यावर त्याने अनेक ब्लॉग लिहिले आहेत.
दरम्यान, कौमुदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शाळेत असल्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती.