Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar : मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकारांचा विवाहसोहळा गेल्या काही दिवसांत थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं. शाल्व-श्रेया, किरण गायकवाड, निखिल राजेशिर्के, रेश्मा शिंदे असे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेने तब्बल पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक पात्राला घराघरांत पसंती मिळाली. अरुंधती, यश, अभिषेक, अनघा, अप्पा, अनिरुद्ध, आरोही या सगळ्या पात्रांचा घराघरांत एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला होता. यापैकी आरोहीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कौमुदी वलोकरने मालिका संपल्यावर खऱ्या आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच कौमुदीचं ग्रहमख पार पडलं होतं. आता तिच्या हातावर मेहंदी सजली आहे.

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…”
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
neha gadre marathi actress announces pregnancy
इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल
bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!

हेही वाचा : Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…”

कौमुदीच्या ( Kaumudi Walokar ) घरात आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून तिचे जवळचे मित्रमंडळी अभिनेत्रीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कौमुदीच्या मेहंदी सोहळ्याला आता सुरुवात झाली असून, याची लहानशी झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे. तो कलाविश्वापासून दूर आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांनी काही दिवसांपूर्वीच कौमुदीचं केळवण केलं होतं. तिच्या ( Kaumudi Walokar ) केळवणासाठी खास फुलांची आणि केळीच्या पानांची सजावट करण्यात आली होती. यशची भूमिका साकारणारा अभिषेक देशमुख तसेच त्याची पत्नी कृतिका देव. अनिशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमंत ठाकरे आणि अश्विनी महांगडे यांनी अभिनेत्रीच्या केळवणासाठी खास व्यवस्था केली होती.

हेही वाचा : १९ व्या दिवशी ‘Pushpa 2’ च्या कमाईत घसरण, चित्रपटाने तिसऱ्या सोमवारी कमावले फक्त इतके कोटी…; एकूण कलेक्शन किती?

हेही वाचा : कधी ब्लॅकमध्ये तिकिटं विकली; तर कधी केलं स्पॉटबॉयचं काम, ‘असा’ आहे अनिल कपूर यांचा बॉलीवूडमधील प्रवास; जाणून घ्या

दरम्यान, आता लवकरच विवाहबंधनात अडकून कौमुदी ( Kaumudi Walokar ) एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नाला कलाविश्वातील तिचे जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader