Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kelvan Photos : सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिषेक-सोनाली, रेश्मा शिंदे, हेमल इंगळे, शाल्व-श्रेया यांच्यासह आता आणखी एक मराठी अभिनेत्री आपली रेशीमगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या अभिनेत्रीचा साखरपुडा पडला होता. आता लवकरच लग्नबंधनात अडकून ही अभिनेत्री आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू करणार आहे.

‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte ) ही मालिका या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र, त्याआधीच मालिकेचं शूटिंग १९ नोव्हेंबरला संपलं असून सगळे कलाकार आपआपल्या स्वगृही परतले आहेत. जवळपास ५ वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामधील प्रत्येक भूमिका घराघरांत लोकप्रिय झाली होती. मालिकेत यशची बायको आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच खऱ्या आयुष्यात लग्न करणार आहे. सध्या तिच्या केळवणाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : “दोघांचं जमलंय?” भूषण प्रधानच्या वाढदिवशी ‘Love You’ म्हणत अनुषाने लिहिली खास पोस्ट; कमेंट्सचा पाऊस

शूटिंग संपवून घरी आलेल्या लेकीचं तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रेमाने औक्षण केलं. केळवणासाठी कौमुदी पारंपरिक लूक करून तयार झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीसाठी अगदी साग्रसंगीत सर्व जेवण बनवलं होतं. “सुगरण मामी आणि मामा, हौशी दादा-वहिनी” असं कॅप्शन देत कौमुदीने यावर केळवण असं लिहिलं आहे. यावरून ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे. या जोडप्याच्या साखरपुड्याचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा : Video: “दारू, सिगारेट प्यायची असेल तर…”, सिद्धार्थ जाधवच्या आईने दिला होता मोलाचा सल्ला, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…

Aai Kuthe Kay Karte
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं केळवण ( Aai Kuthe Kay Karte )

दरम्यान, कौमुदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘शाळा’ चित्रपटामधून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. तसेच छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte ) मालिकेत तिने साकारलेली आरोही प्रेक्षकांना सुद्धा भावली. या मालिकेमुळे कौमुदी खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचून सर्वत्र लोकप्रिय झाली.