‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर मधुराणी खूप सक्रिय असते. सतत फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या सोशल मीडियावरील कवितांचे व्हिडीओ हे नेहमी व्हायरल होत असतात. नुकताच तिने मुलगी स्वराली हिच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने मुलीबरोबर जेवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये खास कुळथाचं पिठलं आणि इंद्रायणी भात यावर मायलेकी ताव मारताना दिसत आहेत. व्हिडीओत मधुराणी म्हणतेय की, थंडीत आणि हिवाळ्यात अत्यंत आवडता मेन्यू कुळथाचं पिठलं आणि इंद्रायणी भात. अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिल आहे, “अजून कोणा कोणाला आवडतो हा मेनू? कुळथाचं पिठलं आणि इंद्रायणी भात…”
हेही वाचा – Bigg Boss 17: इशा मालवियाच्या ‘त्या’ कृतीवर भडकली मन्नारा चोप्राची बहीण, म्हणाली, “गटार तोंड अन् मानसिकता…”
मधुराणीच्या या व्हिडीओवर कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रतिक्रिया देत म्हणाली, “मला तर खूप…” तर सुकन्या मोने म्हणाल्या, “मलाही प्रचंड आवडत…. मस्त वाफाळलेला भात आणि कुळीथ पिठलं त्यावर मस्तपैकी साजूक तुपाची धार…”

हेही वाचा – स्वानंद तेंडुलकरने पत्नी गौतमी देशपांडेसाठी केले खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मधुराणीने मुलीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती; जी देखील खूप व्हायरल झाली होती. अभिनेत्रीने मुलगी आणि भाचीबरोबरचा फोटो शेअर करत लिहिल होतं, “आत्ता आत्ता हाताचा पाळणा करून जोजवत होतो यांना…बघता बघता आपल्या उंचीला आल्यासुद्धा…किती झरझर मोठ्या होतात लेकी…माझी भाची इरा आणि स्वराली बरोबरची मैत्री मोमेंट..”