टीव्ही मालिका, चित्रपट, वेबसीरीज यामध्ये दिसणारे कलाकार हे त्यांच्या भूमिकांबरोबरच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो, व्हिडीओ यामुळे या कलाकारांची मोठी चर्चा होताना दिसते. आता अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कामाविषयी, आई कुठे काय करते आधी ती मुख्य प्रवाहात का नव्हती, तसेच तिला काम का मिळत नव्हते, तो काळ तिच्यासाठी कसा होता, यावर वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी प्रत्येकाला भेटून सांगितलं होतं…

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकतीच मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी आई कुठे काय करते आधी तुला काम करण्याची संधी का मिळत नव्हती? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना याचे कारण सांगताना अभिनेत्रीने म्हटले, “सतत दिसत राहण्याची लोकांची ज्या पद्धतीने अपेक्षा असते. त्या पद्धतीने तुम्ही दिसत राहत नाही. त्याही काळात मी विचार केलेला की मला मुलीला सांभाळून नाटक करायला जमेल. आज मला दर आठवड्याला एक फोन नाटकासाठी येतो. त्यावेळेला मी प्रत्येकाला भेटून सांगितलं होतं की मला नाटक करायचं आहे. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की मालिकेत प्रसिद्ध असलेल्या लोकांना आम्ही नाटकात घेतो. त्यांची काही चूक नाही. कारण-हा व्यवसाय आहे आणि मी समजू शकते. आज मी जर निर्माती असेल तर मी म्हणेन की बाई मी गुंतवलेले पैसे परत मिळाले पाहिजेत.हाऊसफुल व्हायला पाहिजे. नवीन माणसाला मी कसं घेऊ? मी त्यावेळी प्रसिद्ध नव्हते.”

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकतीच आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारली होती. या भूमिकेने मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. आजही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसते. सुरूवातीला कुटुंबासाठी सर्वकाही करणारी अशी ही अरुंधती अन्यायाविरूद्ध उभी राहिल्याचे पाहायला मिळाले. पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आई कुठे काय करते मालिकेत मधुराणी प्रभुलकरबरोबरच अभिनेत्री रूपाली भोसले व अभिनेते मिलिंद गवळी प्रमुख भूमिकेत दिसले.

दरम्यान, आता अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे दिसते. आता ती कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे
महत्वाचे ठरणार आहे.