छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. मालिकेतील पात्रही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. याच मालिकेत ‘संजना’ हे पात्र साकारून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली. सध्या संजनाच्या बदललेल्या लूकची चर्चा होताना दिसत आहे.
रुपालीने काही दिवसांपूर्वीच तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कशासाठी केला आहे? ‘आई कुठे काय करते’मधील संजनाचं पात्र काही वेगळं वळण घेणार आहे का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तिच्या या बदललेल्या लूकबाबत जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. रुपालीच्या बदललेल्या लूकमागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
हेही वाचा >> प्रवीण तरडेंचं फेसबुक अकाऊंट हॅक, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाले “कुठल्याही मेसेजवर…”
हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?
‘प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्या’साठी रुपालीने हा खास लूक केला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर रुपाली डान्स करणार आहे. याचसाठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा >> “१२ तास प्रवास करून एका सीनसाठी…”, ‘बिग बॉस’च्या घरात अपूर्वा नेमळेकरने सांगितल्या ‘शेवंता’च्या आठवणी
रुपाली या परफॉर्मन्ससाठी अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२’ सोहळा रविवार १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे.