देशभरात सध्या दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वत्र आनंदाच वातावरण पसरलं आहे. दिवाळीच्या निमित्ताने लोकं नवनवीन वस्तूंची खरेदी करत आहेत. कलाकार मंडळी देखील आलिशान गाड्या खरेदी करताना दिसत आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने सुद्धा आलिशान गाडी खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीच्या घरी आला नवा सदस्य; व्हिडीओ शेअर करून दिली आनंदाची बातमी
आलिशान गाडी खरेदी करणारी ही अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ईशाची भूमिका साकारलेल्या या अभिनेत्रीने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवी गाडी खरेदी केली आहे. ‘हुंडई एक्सटर’ ही गाडी अपूर्वाने घेतली आहे. गाडीबरोबरचा फोटो शेअर करत तिने लिहीलं आहे, “यंदाची दिवाळी जरा जास्तच खास आहे. कृतज्ञता आणि प्रेमाने या नवीन सदस्याचे स्वागत करत आहे.”
हेही वाचा – दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदेशाहीचं उद्योग जगतात पदार्पण; पंढरपुरात सुरू केलं पहिलं…
अपूर्वाच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री खुशबू तावडे, अश्विनी कासार, साक्षी गांधी, गौरी कुलकर्णी, अश्विनी महांगडे अशा अनेक कलाकार मंडळींनी अपूर्वाला नवी गाडी घेतल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: उटणं लावून अभ्यंगस्नान, औक्षण अन्…; मायरा वायकुळची ‘अशी’ झाली दिवाळी पहाट
दरम्यान, अपूर्वाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ईशाच्या भूमिकेमुळे तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ईशाने या मालिकेव्यतिरिक्त हिंदी मालिकेतही काम केलं आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अपूर्वा झळकली होती.