गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मधील कलाकार मंडळी विविध माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ईशा म्हणजे अभिनेत्री अपूर्वा गोरेने नुकताच ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी तिने ईशा पात्रासाठी झालेल्या ऑडिशनचा मजेशीर किस्सा सांगितला. अपूर्वा म्हणाली, “माझी ऑडिशनची मजेशीर गोष्ट आहे. मी ही गोष्ट सगळ्यांना सांगते आणि तो महिना मला तारखांसकट लक्षात आहे. कारण मी पुण्याची आहे. मी मुंबईला नाटक बघायला आले होते. कॉलेजनंतर पुण्याहून मुंबईला नाटक बघायला जाऊ हे खूप असतं. म्हणून मी काही मित्रांबरोबर मुंबईला नाटक बघायला आले होते. मुंबईत एक ठिकाण आहे आरामनगर तिथे खूप ऑडिशन होतात. मी जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा असं व्हायचं एक दिवस येऊ आणि तिथे चक्कर मारून जाऊ, असं करायचे.”

हेही वाचा – “जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

ऑडिशन देऊनही सिलेक्ट होतं नव्हती म्हणून अपूर्वा झालेली त्रस्त

पुढे अपूर्वा गोरे म्हणाली, “आरामनगरच्या पलीकडे एक बीच आहे. तिथे मला फिरायला खूप आवडतं. कारण मला समुद्र हा प्रकार खूप आवडतो. त्यामुळे पुण्यातून आले की वर्सोवा बीचच्या इथे मी ऑडिशन द्यायला गेले की मी तिथे थोड्या वेळासाठी बसायचे. अशीच मी संध्याकाळी शाळेतील एका कुठल्यातरी मित्राला भेटले. तिथे मी बीचवर बसले होते आणि मला एक फोन आला. माझ्या पुण्याच्या एका मित्राचा तो फोन होतो. तो म्हणाला, अगं एका अमूक-अमूक व्यक्तीने तुझा फोन नंबर घेतलाय ते तुला फोन करतील. मी म्हटलं, ठीक आहे. असेल काहीतरी. त्याचवेळीस मी ऑडिशन देण्याच्या प्रक्रियेत माझा एक शो संपला होता. काहीही जुळून येत नव्हतं. त्यामुळे ठीक आहे, आता होत नाहीये ना. ऑडिशन देतोय तरीही सिलेक्ट होत नाहीये. त्यामुळे मी त्रस्त होते.”

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनानंतर ‘टाइम गॉड’ झाली मराठी अभिनेत्री? आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

“थोड्यावेळाने मी रिक्षात बसले. तेव्हा मला फोन आला. म्हणाले, असं,असं तुझा नंबर मिळाला तू उद्या ऑडिशन द्यायला येशील का? मी म्हटलं, अरे यार उद्या माझ्याच्या ट्रेनचं बुकिंग आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, सर, मी उद्या लवकर येऊ का? माझ्या ट्रेनचं बुकिंग आहे. कारण मला या ऑडिशनकडूनही जास्त अपेक्षा नव्हती. पण मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन ऑडिशन दिली. मला दोन तासांत कॉल आला की, तुझं सिलेक्शन झालं आहे. माझ्या साइजचे कपडे वगैरे सगळं तयार झाले होते. मी त्याच्या दुसऱ्या दिवशी समुद्धी बंगल्यावर चित्रीकरण करायला होते,” असं अपूर्वा गोरे म्हणाली.

हेही वाचा – नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने, पोस्ट होतेय व्हायरल

“पहिलं आमचं मॉक शूट झालं. त्यावेळेस मी फक्त दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते. मी इथे घर घेतलं. मग मी मधुराणी ताईबरोबर शिफ्ट झाले. त्यानंतर आम्ही दोन वर्ष एकत्र राहिलो. पण तो एक महिना मी दोन दिवसांच्या कपड्यांवर काढला. कारण की, मला अपेक्षितच नव्हतं असं काहीतरी घडेल. त्यानंतर करारावर सही झाली. घरचे माझे सामान घेऊन आले. कारण सलग माझं शूटिंग सुरू होतं. माझ्या आयुष्यातील हा सुखद धक्का होता. अचानक सगळं घडलं. सुरुवातीला मी खूप निराश असायचे. कारण इथे सगळेच मोठे कलाकार होते. पण, मला अजिबात कोणी वाटू दिलं नाही, की तू लहान आहेस वगैरे. सगळ्यांनी खूप समजून घेतलं. काही चुकलं तर मला सांगितलं किंवा काही छान केलं तर कौतुकही केलं. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही करिअरमध्ये पुढे जात असता तेव्हा कौतुक करणं खूप कमी होतं. पण, इथे कोणीची कौतुक करण्यासाठी मागे नाही थांबतं. सीन झाला की, आप्पा असो, मधुराणी ताई असो किंवा मिलिंद सर असो, रुपाली ताई असो तेव्हाच्या तेव्हा सांगितलं सीन खूप छान झाला,” असं अपूर्वा गोरे म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame apurva gore shares a story about isha character audition pps