‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतेच या मालिकेने १ हजार भाग पूर्ण केले. डिसेंबर २०१९ मध्ये सुरु झालेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गेली साडे तीन वर्षे अधिराज्य केलं आहे. अरुधंती, यश, अनिरुद्ध, संजना, ईशा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जातं. अभिनेत्री अपूर्वा गोरेला ‘ईशा’ या पात्रामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. लवकरच ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नवीन अभिनेत्याचं पदार्पण, समीर चौघुलेंनी फोटो केला शेअर, नम्रता संभेराव म्हणाली…

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
laxmichya paulanni apurva sapkal exit from show
ध्रुव दातार पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका! तिच्याऐवजी मालिकेत कोण झळकणार?
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Deepika Padukone Ramp Walk
Video : लेकीच्या जन्मानंतर पहिला रॅम्प वॉक! दीपिका पादुकोणचा ‘तो’ लूक पाहून नेटकऱ्यांना आठवली रेखा, कमेंट्सचा पाऊस
mamta kulkarni took sanyas
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर

‘आई कुठे काय करते’मधील ईशाला म्हणजे अभिनेत्री अपूर्वा गोरेला हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे. अभिनेत्रीने याची माहिती इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना दिली आहे. स्टार प्लसवरील ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अपूर्वा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा प्रोमो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Video: “असा व्हिडीओ नको बनवू”; कंगनाच्या गाण्यावर मानसी नाईकचा डान्स पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “तुझ्या…

अपूर्वा हा प्रोमो शेअर करत लिहिते, “एक नवी सुरुवात, एक नवा प्रवास, एक नवा अध्याय…आपण सगळे मिळून कुणाल आणि वंदनाच्या प्रेमाचे साक्षीदार होऊया. २१ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता स्टार प्लसवर ‘बातें कुछ अनकही सी’ही मालिका पाहायला विसरु नका.”

हेही वाचा : तुमच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट बनला तर नाव काय असेल? कोणते कलाकार असतील? सुबोध भावे ‘या’ कलाकारांची नावं घेत म्हणाला…

अपूर्वाने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अभिनेता मोहित मलिक आणि मराठमोळी अभिनेत्री सायली साळुंखे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मालिकेतील नायिकेची पार्श्वभूमी मराठी घरातील असल्याने यामध्ये सायली आणि अपूर्वासह अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader