‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरांत लोकप्रिय झाली. आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अश्विनी अनघा हे पात्र साकारत आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

अश्विनीने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना नवीन घर घेतल्याची खुशखबर दिली होती. आता अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह तिच्या नव्या घराची झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. अश्विनीचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न साकार झालं आहे. यावेळी तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेंड नील देखील उपस्थित होता.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही वाचा : अयोध्येत कलाकारांची मांदियाळी! माधुरी दीक्षितच्या पतीने बॉलीवूडकरांसह काढला सेल्फी, फोटो व्हायरल

अश्विनी नव्या घराची पहिली झलक दाखवत लिहिते, “आपल्या कामात ‘राम’ शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच. अर्थात स्वप्नं एकचं असलं तरी त्यासाठी बळ देणारे हात फार महत्त्वाचे असतात. या स्वप्नासाठी आम्हाला कोणत्या न कोणत्या कारणाने मदत करणाऱ्या सगळ्यांचेच आम्ही ऋणी आहोत. पहिल्या पायरीपासून ते २१ मजले हा प्रवास तसा काही मिनिटांचा आहे पण आम्हाला खूप वेळ लागला. चांगलं – वाईट, सुख – दुःख असं सगळंच बरोबर घेऊन पुढे आलो आणि हे एक स्वप्न पूर्ण करू शकलो.”

हेही वाचा : Video : “प्रभू तुमचे स्वागत असो!” प्रवीण तरडेंनी केली प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा; पत्नी म्हणाली, “कलियुगातील…”

दरम्यान, अश्विनीने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ऋतुजा बागवे, अक्षया गुरव, कौमुदी, सीमा घोगळे या अभिनेत्रीने तिला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader