स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे या मालिकेत अनघा हे पात्र साकारत आहे.
अश्विनीने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची भरजरी साडी नेसून ग्लॅमरस लूक केल्याचं दिसत आहे. अश्विनीने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. “प्रत्येक साडीची तिची तिची एक गोष्ट असते. आणि जर लग्नातील “शालू” असेल तर मग…”, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतने किरण मानेंबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…
अश्विनीने फोटोमध्ये मेकअप आर्टिस्टच्या लग्नातील शालू नेसला आहे. “दीपा यांच्या लग्नातील २२ वर्षापूर्वीचा शालू…शालू दाखवताना त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. डोळे थोडे पाणावलेले…हजारो आठवणी त्या काही क्षणांत त्यांच्या डोळ्यासमोर आल्या असाव्या. शालूमध्ये असते आईची माया, दोन घरांना सामावून घेण्याची जबाबदारी असते”, असंही पुढे तिने फोटोमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
हेही वाचा>> लेकीला स्तनपान करतानाचा आलिया भट्टचा फोटो व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य काय?
हेही वाचा>> उर्फी जावेदला झाला आहे ‘हा’ गंभीर आजार; दुबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल
‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अनघा गरोदर असताना अभिषेकने तिचा विश्वातघात केल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच अनघाने गोंडस मुलीला जन्म दिल्याचं मालिकेत दाखवण्यात आले आहे. पुढे मालिकेत अनेक उत्कठांवर्धक वळण आल्याचे पाहायला मिळणार आहेत.