‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांनी आपलंस करून घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र हे लोकप्रिय ठरलं आहे. मग ती अरुधंती असो किंवा संजना, प्रेक्षकांनी प्रत्येकाला डोक्यावर घेतलं आहे. अशातच या मालिकेतील अनघा म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडेने खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे. याचा व्हिडीओ शेअर करत तिने जेजुरी गडावरचा अनुभव सांगितला आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध व्हिडीओ, फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती चालू घडामोडींवर देखील परखड भाष्य करत असते. नुकताचं तिने खंडेरायाचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Abhijeet Sawant Reel Video With Wife And Daughters
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा पत्नी अन् मुलींबरोबर सुंदर Reel व्हिडीओ; योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर म्हणाली…
Marathi actress Mitali Mayekar could not recognize her husband Siddharth Chandekar song
Video: मिताली मयेकर नवरा सिद्धार्थ चांदेकरचं गाणं ओळखू शकली नाही, म्हणाली, “आता घरी जाऊन फटके”
Rashmika Mandanna leg injury travel with wheelchair Hyderabad Airport Video Viral
Video: ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी रश्मिका मंदाना लंगडत पोहोचली विमानतळावर, व्हीलचेअरवरचा व्हिडीओ व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
Marathi actress Shivani Sonar Dance on Ajay Atul Song Bring it on Watch video
Video: शिवानी सोनारचा स्वतःच्याच हळदीत भन्नाट डान्स, अजय-अतुलच्या लोकप्रिय गाण्यावर अभिनेत्री थिरकली, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मर्सिडीज आली, थांबली, काच खाली केली अन्…; गौरव मोरेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “खूप भरून आलं…”

अश्विनीने हा व्हिडीओ शेअर करत अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “यळकोट यळकोट जय मल्हार…सदानंदाचा येळकोट… अखेर देवाने गडावर दर्शनासाठी बोलावलं.. इतक्या वेळा जेजुरीहून कुठेतरी कार्यक्रमानिमित्त जाणं झालं. गेल्या वर्षी ‘मन मंदिरा गजर भक्तीचा’चे वारीचे शूट जेजुरीच्या रस्त्यावर केलं. पण गडावर दर्शनासाठी जाणं झालंच नाही. मी जेव्हा तिथून जायचे आणि गड पाहायचे तेव्हा हेच मनात यायचं की देवाने अजून बोलावणं केलंच नाही. कधी योग येणार? कधी दर्शन होणार? आणि देवांनी सांगावा धाडला…दर्शन झाल्यावर जो आनंद झाला आणि तिथे जे जाणवलं ते मांडता येणं कठीण.”

हेही वाचा – “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”

दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘मेरे साई’ या मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती. तसेच अश्विनी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातही झळकली होती.

Story img Loader