‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील एक अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने काही वक्तव्य केली. शिवाय आयुष्यातल्या संघर्षमय काळातील प्रसंग सांगितले. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे.

अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकतीच ‘अजब गजब पॉडकास्ट’ला मुलाखत दिली. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं; जे चर्चेत आलं आहे. तसेच याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”

हेही वाचा – ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री ३५व्या वर्षी होणार आई; महाराष्ट्रीय पद्धतीत थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

या व्हिडीओत अश्विनी म्हणतेय, “आता आपण बघतो ९० वर्षांच्या आजी या राज्याभिषेकादिवशी किंवा शिवजयंतीला त्या रायगडावर जातात. ही त्यांच्यात ऊर्जा कुठून येते? आणि अशा वेळेला काही लोकं मला म्हणतात, काय तुम्ही सारखं शिवाजी महाराज, शिवाजी महाराज करत असतात. म्हणजे किती वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यावेळेला मला त्यांच्यावर हसू येतं. जर महाराज नसते ना तर तुमची आडनावं मुल्ला, खान अशी असती. जे आता आपण सांगतो ना की, या या जातीचे, आम्ही बारा बलुतेदार, अठरा पगड जातीचे हे हे आहोत. हे का सांगताय तुम्ही? काय राहिलं असतं आपलं?”

अश्विनीने केलेलं हे वक्तव्य नेटकऱ्यांना पटलं असून अगदी बरोबर बोलता, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका नेटकरीनं लिहीलं आहे, “हे बोलायला हिंमत लागते.”

हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? मराठी मालिकाविश्वातील आहे लोकप्रिय खलनायिका

दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘मेरे साई’ या मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती. तसेच अश्विनी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातही झळकली होती.

Story img Loader