स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम चर्चेत असते. अश्विनीने नुकतंच तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तिने नुकतंच एक नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.
अश्विनी ही सोशल मीडियावर कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच अश्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या चाहत्यांना नवीन गाडी घेतल्याची गुडन्यूज दिली आहे. याचे काही फोटोदेखील तिने शेअर केले आहेत.
आणखी वाचा : प्राजक्ता माळी पुढच्या वर्षी लग्न करणार का? तिच्या विश्वासू ज्योतिषांनी वर्तवलेलं भविष्य वाचा…
“तुम्ही घेतलेल्या कठोर परिश्रमाचे फळ कायमच तुम्हाला मिळते. स्व-कष्टाचं फळं. नानांचा आशिर्वाद. स्वप्नपूर्ती. आता मी देखील उडणार”, अशा आशयाची एक पोस्ट तिने शेअर केली आहे. या पोस्टबरोबर तिने तिच्या गाडीचा नंबरही शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अनघा गरोदर असताना अभिषेकने तिचा विश्वातघात केल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच अनघाने गोंडस मुलीला जन्म दिल्याचं मालिकेत दाखवण्यात आले आहे. त्यानंतर आता पुढे मालिकेत काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या मालिकेत अनेक उत्कठांवर्धक वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहेत.