‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आता घराघरात पोहोचल्या आहेत. अरुंधती ही व्यक्तिरेखा जरी केंद्रस्थानी असली तरी इतर व्यक्तिरेखांवर प्रेक्षक तितकंच प्रेम करत आहेत. आता या मालिकेतील एक अभिनेत्री नव्या भूमिकेतून नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत ही अभिनेत्री झळकणार आहे.
हेही वाचा – “जर माझ्या मुलीचा जन्म गाझामध्ये झाला असता तर…” स्वरा भास्करच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ईशा व अक्षर कोठारी व्यतिरिक्त अभिनेत्री किशोरी अंबिये देखील पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासून या नव्या मालिकेची चर्चा सुरू आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील एक अभिनेत्री झळकणार आहे. ती म्हणजे अभिनेत्री दीपाली पानसरे. दीपालीने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाची व्यक्तिरेखा साकारली होती. पण कोरोनाचा काळ्यात दीपालीने ही मालिका सोडली. त्यानंतर आता ती ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. महत्त्वाच्या भूमिकेत ती झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – क्रांती रेडकरने शेअर केला लेकींच्या गरबा डान्सचा व्हिडीओ, म्हणाली…
हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री; झळकला महत्त्वाच्या भूमिकेत
दरम्यान, दीपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘आई तुझा आशीर्वाद’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. तसेच तिने ‘देवी’, ‘देवयानी’ अशा बऱ्याच मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.