‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता या मालिकेतील कलाकार विविध भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आरोही म्हणजेच अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या पतीने पहिल्यांदाच आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा फोटो कौमुदीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री कौमुदी वलोकरचं २६ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. तिने आकाश चौकसे याच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. कौमुदी आणि आकाशच्या लग्नाला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील बरेच कलाकार मंडळी उपस्थित राहिले होते. ग्रहमख, मेहंदी, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्व लग्नसोहळा कौमुदी आणि आकाशचा पार पडला. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यांनी आकाशने आलिशान गाडी खरेदी केली आहे.

कौमुदीच्या पतीने माझदा कंपनीची गाडी घेतली आहे. याचा फोटो शेअर करत कौमुदी म्हणाली, “अभिनंदन नवऱ्या. ही त्याची पहिली गाडी आहे. पहिली गोष्ट ही नेहमीच खास असते.”

कौमुदी वलोकर इन्स्टाग्राम स्टोरी

काही दिवसांपूर्वीच कौमुदी वलोकरने पतीसह आग्र्यातील ताज महालला भेट दिली होती. याचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. दरम्यान, कौमुदीच्या पतीबद्दल बोलायचं झालं तर, आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. आकाश UC Berkeleyसाठी संशोधक म्हणून काम करतो. शिवाय ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसंच त्याची स्वतःची वेबसाइट आहे. ज्यावर त्याने अनेक ब्लॉग लिहिले आहेत.

कौमुदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शाळेत असल्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती.