ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. वयाच्या ९२व्या वर्षी प्रभा अत्रे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला असून मोठं नुकसान देखील झालं आहे. राजकीय, कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी प्रभा अत्रे यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन, स्वरयोगिनीची स्वरसाधना शांत!

Harshvardhan Rane
“एक मुलगी अचानक माझ्या कारमध्ये आली अन्…”; ‘सनम तेरी कसम’फेम हर्षवर्धन राणेने सांगितला किस्सा, म्हणाला…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
What Anna Hajare Said?
Anna Hazare Emotional : अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले; “तुमच्यावर इतकं प्रेम केलं, पण..”
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने देखील प्रभा अत्रे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर प्रभा अत्रे यांच्या आवाजातील ‘जागू मै सारी रैना’ या गाण्याच्या व्हिडीओ शेअर करून अभिनेत्रीने पोस्ट लिहिली आहे. मधुराणीने लिहिल आहे, “भावपूर्ण श्रद्धांजली, प्रभाताई. तुमच्या सुरांनी माझ्यासारख्या कित्येकांची आयुष्य प्रकाशमान केलीयेत तुम्ही…अशा कशा अचानक विलीन झालात ?”

मधुराणीच्या या पोस्टवर प्रभा अत्रे यांच्या अनेक श्रोत्यांनी कमेंट केल्या आहेत. प्रभा अत्रेंना श्रद्धांजली वाहली आहे. एका नेटकरीने लिहिल आहे, “खरंच निःशब्द…ताईंचा मारु बिहाग, कलावती कायम स्मरणात राहतील..”

दरम्यान, भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना १९९० मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित केले. त्यानंतर २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण‘ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी तसेच पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अत्रे यांची संगीतावरील अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत.

Story img Loader