छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखलेला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधती तिच्या आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करत असते. तिच्या सुमधूर आवाजाचे अनेक चाहते आहेत. अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी खऱ्या आयुष्यातही एक उत्तम गायिका आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या भागात एक अंगाई अरुंधती गाताना दिसली होती. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातील ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी गायलेली ही अंगाई आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा>>“…ते कधीच थांबत नाहीत”; तुनिषा शर्माने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेला सेटवरील व्हिडीओ

मधुराणीने तिच्या सोशल मीडियावर मालिकेतील अंगाई गातानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. “सलीलने बांधलेली गाणी गाणं हा गाणाऱ्याला समृद्ध करणारा अनुभव असतो. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एकदा काय झालं ह्या सुंदर चित्रपटातली ही हळवी अंगाई. ‘आई कुठे काय करते’मध्ये माझ्या नशिबाने मला अनेक गाणी गाण्याची संधी मिळते आणि त्या निमित्ताने नवीन गाणी बसवली ही जातात. गाण्याचं धाडस केलंय. गोड मानून घ्या”, असं मधुराणीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>>“तुझ्याकडून ही अपेक्षा…”, शर्टचे बटण उघडे ठेवून बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल

सलील कुलकर्णी यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. “वाह…तू नेहमीच मन लावून गातेस”, असं त्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. सलील कुलकर्णी यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरुन अरुधंतीने गायलेल्या अंगाईचा व्हिडीओ शेअर करत तिचं कौतुक केलं होतं. याशिवाय चित्रपटातील त्यांची अंगाई घेतल्याने त्यांनी मालिकेच्या टीमचे आभारही मानले होते.

हेही पाहा>> Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत अभिषेक व अनघाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. परंतु, अभिषेकने अनघाचा विश्वाघात केल्यामुळे आता मालिका वेगळं वळण घेत असल्याचं पाहायला मिळणार आहे.

Story img Loader