Madhurani Prabhulkar New Home : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती घराघरांत लोकप्रिय आहे. गेली पाच वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांबरोबर प्रेक्षकांचं एक अनोखं नातं तयार झालं आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या घडीला घराघरांत मधुराणीला अरुंधती म्हणून ओळखलं जातं. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.

‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने मुंबईत आपलं हक्काचं घर खरेदी केलं आहे. आपल्या लेकीसह तिने या नव्या फ्लॅटची पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीची लेक हे नवीन घर पाहून भारावून गेल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मधुराणीच्या व्हिडीओवर शुभेच्छा अन् कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
devmanus Fame Kiran Gaikwad share reel video with future wife Vaishnavi kalyankar
Video: जगणं हे न्यारं झालं जी…; ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने पहिल्यांदाच होणाऱ्या पत्नीसह Reel व्हिडीओ केला शेअर, पाहा

हेही वाचा : “निक्की ६ आठवडे त्रास देतेय, तिची भाषा…”, आर्याला Eliminate केल्यावर पुष्कर जोग संतापला! म्हणाला, “ती चुकली, पण…”

मधुराणी गोखलेने खरेदी केलं नवीन घर

मधुराणी ( Madhurani Prabhulkar ) नव्या घराची पहिली झलक शेअर करत लिहिते, “मुंबईत आपलं स्वतःचं घर असावं आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न…! ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आनंद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे. आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ यामुळेच हे स्वप्न साकारलंय…!!! सविनय व सादर आभार”

Madhurani Prabhulkar
अरुंधतीने मुंबईत घेतलं नवीन घर ( Madhurani Prabhulkar )

मुधराणीच्या ( Madhurani Prabhulkar ) पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. सुकन्या मोने यांनी “मनःपूर्वक अभिनंदन! खरं आहे पार्ल्यात घर घेणं सोप्प नाहीये. पण, ते तू करून दाखवलं आहेस” अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

दरम्यान, या वर्षांत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी नवीन घरं, गाड्या खरेदी करत आपली स्वप्नूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. यात आता मधुराणी ( Madhurani Prabhulkar ) नाव देखील जोडलं गेलं आहे.

Story img Loader