‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली आहे. मधुराणीने अरुंधती ही भूमिका उत्तमरित्या निभावल्यामुळे प्रेक्षक अजूनही तिच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. महिलांसाठी तर अरुंधती एक आयडॉल झाली आहे. अशा या लोकप्रिय अरुंधतीला म्हणजे मधुराणीला चाहते नेहमी सेटवर भेटवस्तू पाठवत असतात. नुकत्याच एका चाहतीने पाठवलेल्या भेटवस्तूचा व्हिडीओ मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला ‘या’ अभिनेत्रीची येतेय आठवण; फोटो शेअर करत म्हणाली…

Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

मधुराणी ही उत्त्कृष्ट अभिनेत्री तर आहेच, पण ती उत्तम कवयित्री सुद्धा आहे. तसेच ती नेहमी तिची परखड मत व्यक्त करत असते. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, तिला एका चाहतीने सुंदर चित्र भेटवस्तू म्हणून दिलेलं दिसत आहे. चाहतीने हे रेखाटलेलं चित्र पाहून मधुराणीला गहिवरून येतं. हे चित्र पाहत असताना तिचे डोळे पाणावतात. या चित्राच्या मागे चाहतीने तिच्यासाठी कविताच्या काही ओळी देखील लिहिल्या आहेत. त्या ती वाचून दाखवताना दिसतं आहे. मधुराणी म्हणते की, ‘घेईन एक उंच झेप, क्षितीजांपर्यंत जाईन थेट, बंधनातून मज मुक्त करा, वाटत पाहते माझी वसुंधरा.’

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला ‘नवरा मिळाला’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हा व्हिडीओ मधुराणीने शेअर करत लिहीलं आहे की, “इतक्या प्रेमाने इतकं सुंदर चित्र कोणी रेखाटून पाठवल्यावर मन इतकं भरून येतं की डोळ्यातून वाहून जातं. शिल्पा पवार या कलावतीचे खूप खूप आभार आणि उदंड प्रेम”

हेही वाचा – “जो भी होगा देखा जायेगा” म्हणत एव्हरग्रीन नारकर कपलनं नवा व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले…

दरम्यान, काही दिवसांपासून मधुराणी पतीपासून विभक्त होणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. पण पती म्हणजे प्रमोद प्रभुलकरने या चर्चांना पूर्णविराम दिला. “आमच्यात घटस्फोट घेण्यासारखं काहीही घडलेलं नसून आम्ही एकत्रच राहत आहोत” , असं स्पष्टीकरण प्रमोद प्रभुलकरने दिले होते.

Story img Loader