‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ नेहमीच चर्चेचा विषय असते. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहे. २०१९ला अखेरीस सुरू झालेली ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती हे पात्र विशेष लोकप्रिय ठरले आहे. अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबर तिच्या कविताही आता चांगल्याच चर्चेत असतात. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मधुराणीने तिच्यामधल्या आणखी एका कौशल्याचा खुलासा केला आहे. या अभिनेत्रीने एका चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केल्याचे सांगितले आहे.

‘इसापतीनी एंटरटेन्मेंट’ या युट्यूब चॅनेलवरील छापा काटा या कार्यक्रमात मधुराणी प्रभुलकर सहभागी झाली होती. त्या वेळेस तिला ‘चित्रपटांसाठी लिखाण, कविता किंवा गाणी लिहितेस का’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मधुराणी म्हणाली, “मी मुळात संगीतकार आहे. गाणी संगीतबद्ध करते. सुंदर माझं घर नावाचा जो चित्रपट होता; ज्याचं प्रमोदनं (पती) दिग्दर्शन केलं होतं. त्या चित्रपटातील गाण्यांना मी संगीत दिलं होतं. त्यासाठी गुरू ठाकूरनं काही गीतं लिहिली होती; तर श्रेया घोशाल, साधना सरगम, आरती अंकलीकर यांनी त्या चित्रपटातील गाणी गायली होती. मी चित्रपटातील गाण्यांना संगीत देते, याबाबत फार कोणाला माहीत नाही.”

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
aai kuthe kay karte fame Madhurani prabhulkar entry in Aai Ani Baba Retire Hot Aahet serial
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”

हेही वाचा – Bigg Boss मध्ये सुरू झालेली आणखी एक लव्हस्टोरी संपली; ‘या’ जोडीचा झाला ब्रेकअप

हेही वाचा – Video: उत्साहाच्या भरात अल्लू अर्जुनकडून झाली चूक? ‘पुष्पा-२’चा डायलॉग झाला लीक

मधुराणीच्या या उत्तरावर मुलाखतदार म्हणतो, “अजय-अतुलनं हे बघितलं तर त्यांना फार टेन्शन येईल.” त्यावर मधुराणी म्हणते, “मी गाण्यांना चाली देते हे अजय-अतुल यांना माहीत आहे. अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी या सगळ्यांना याबाबत माहीत आहे; पण त्यांना हेही माहीत आहे की, ही एक अभिनेत्री आहे. ती अभिनयच करेल. त्यामुळे त्यांना टेन्शन नाही.”

हेही वाचा – अभिनेत्री मौनी रॉय ९ दिवसांनंतर हॉस्पिटलमधून परतली; म्हणाली, “प्रकृती…”

दरम्यान, काही दिवसांपासून मधुराणी पतीपासून विभक्त होणार असल्याचा चर्चांना उधाण आले होते. पण तिचा पती म्हणजे प्रमोद प्रभुलकरने या चर्चांना पूर्णविराम दिला. “आमच्यात घटस्फोट घेण्यासारखं काहीही घडलेलं नसून आम्ही एकत्रच राहत आहोत” , असे स्पष्टीकरण प्रमोद प्रभुलकरने दिले.

Story img Loader