छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. या मालिकेत मधुराणी आई म्हणजे अरुंधती हे पात्र साकारत आहे. मधुराणी प्रभुलकरने नुकतंच मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यां संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. तिने पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुराणी प्रभुलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने या संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
आणखी वाचा : “मला २७ वेळा पहिलं प्रेम झालं”, अवधूत गुप्तेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला “वेगवेगळ्या मुलींबरोबर…”

मधुराणी प्रभुलकरची पोस्ट

“कृपया नोंद घ्यावी.
मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड ही मी आणि प्रमोद (प्रभुलकर) आम्ही दोघांनी मिळून सुरु केलेली संस्था. अभिनय प्रशिक्षणाबरोबरच इतरही अनेक कल्पक उपक्रम संस्थेमार्फत आम्ही केले.
परंतु माझ्या विविध क्षेत्रातील वाढलेल्या व्यस्ततेमुळे मला संस्थेच्या दैनंदिन कार्यकारिणीत लक्ष घालता येत नाही. तरी समन्वयाने निर्णय घेत मी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. संस्थेशी माझा आता कोणताही संबंध नाही तरी शुभेच्छा कायम असतीलच”, अशी पोस्ट मधुराणी प्रभुलकरने केली आहे.

आणखी वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

दरम्यान ‘मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड’ ही संस्था ती आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी एकत्र सुरु केली होती. ते दोघेही एकत्र ही अभिनयाची अकॅडमी चालवत होते. या अकॅडमीत आतापर्यंत अनेक कलाकारांनी प्रशिक्षण घेतले आहे. ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर या कलाकारांनी याच अकॅडमीत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar resign from miracles academy of arts and media see post nrp
Show comments