‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ नेहमीच चर्चेचा विषय असते. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. २०१९च्या अखेरीस सुरू झालेली ही मालिका गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती हे पात्र विशेष लोकप्रिय ठरलं आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हे पात्र उत्तमरित्या निभावलं आहे.
अलीकडेच मालिकेतील अरुंधतीचा नवा प्रवास सुरू झाला. तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतरचा अरुंधतीचा प्रवास सध्या पाहायला मिळत आहे. अशातच अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर मालिकेतील चिमुकल्या जानकीचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
हेही वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा, कलाकारांनी ‘असा’ साजरा केला खास क्षण
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर जानकीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “आमची ही छोटी जानकी…बरं गंमत म्हणजे हिचं खरं नावही जानकीच आहे बरं का…ही सेटवर आली की सारं वातावरण बदलून जातं…एक जिवंतपणा येतो संपूर्ण युनिटला…सगळेच तिच्या बाललीलांमध्ये रमून जातात…आज आम्ही माईकच्या प्रेमात आहोत आणि माईकवरून आम्हाला गायचंय…लहानपण देगा देवा …”
हेही वाचा – Video: नवखी चाहूल इवलं पाऊल….; कार्तिकी गायकवाडला मुलगी होणार की मुलगा? डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ समोर
मधुराणी व जानकीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीनं लिहिलं, “अरुंधतीला इतक्या दिवसांनंतर इतकं आनंदी पाहून खूपच आनंद होतोय.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहिलं, “किती गोड आहात दोघीही.” अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.