‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे. गेल्या चार वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. या मालिकेतील अरुंधती तर महिलांसाठी आयडॉल झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून अरुंधतीचा नवा प्रवास सुरू झाला आहे. तिचा दुसरा पती आशुतोषचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यानंतरचा अरुंधतीचा नवा प्रवास सध्या पाहायला मिळत आहे. पण या नव्या ट्विस्टमुळे आशुतोष म्हणजे अभिनेता ओंकार गोवर्धनची मालिकेतून एक्झिट झाली आहे. यासंदर्भात अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकतीच एक पोस्ट केली आहे.

Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”
Ram Teri Ganga Maili
‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटासाठी मंदाकिनी नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीला घेणार होते राज कपूर, पण….; अभिनेत्री ४० वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

हेही वाचा – “तुला कधीच…”, ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची आईसाठी खास पोस्ट, म्हणाली…

मधुराणीने ओंकारबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय…आशुतोषचं ‘जाणं ‘ अनेकांना आवडलं नाहीये…कसं आवडेल…आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला… पण स्वीकाराव्या लागतातच…तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल…गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे…१२/१३ तास सलग असे काही दिवस रडते आहे…अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो..हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते, इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच…डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही (unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात.”

“अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतूपासून गंभीर विषयावरच्या गप्पा, ९०च्या दशकातील गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच…पण हा प्रवास कायम स्मरणात राहील…तुम्ही पाहत राहा…’आई कुठे काय करते’ सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता,” असं मधुराणीने लिहिलं आहे.

हेही वाचा – ‘शुभविवाह’नंतर निळू फुलेंची मुलगी झळकली ‘या’ नव्या मालिकेत, पोस्ट करत म्हणाल्या, “छोटी पण छान भूमिका…”

मधुराणीच्या या पोस्टवर ओंकारने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाली, “मधुराणी मला पण तुझी आठवण कायम येईल.आपण खूप चांगलं काम केलं एकत्र पुन्हा आपण एकत्र काम करूच. तोपर्यंत पुन्हा लवकरात लवकर भेटण्याची आशा आहेच. प्रेम आणि सदिच्छा.”

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका याआधी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होतं होती. पण आता या मालिकेची जागा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेने घेतली आहे. १८ मार्चपासून ही नवी मालिका ७.३० वाजता प्रसारित होतं आहे.

Story img Loader