‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक भूमिका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेच्या मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या अरुंधती भूमिकेला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने ही भूमिका उत्तमरित्या पेलेली आहे. त्यामुळे आजवर ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अशातच मालिकेच्या शुटींगदरम्यानचा अनुभव मधुराणीने चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
हेही वाचा – Video: परिणीती चोप्रा पापाराझींवर भडकली; हात जोडून म्हणाली, “मी तुम्हाला…”
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. नुकताच तिनं मालिकेच्या शुटींगदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. घाटात गाडी चालवण्याचा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहीलं आहे की, “रोज नवीन काहीतरी शिकत असतो आपण…! गाडी चालवायला आवडतेच मला. पण तशी उशीरा शिकले चालवायला … अलीकडेच म्हणायला हवं. गाडी येणं याचे अनेक फायदे वेळोवेळी अनुभवले. पण अशी कधी गाडी चालवू असा विचारही केला नव्हता.”
हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मराठी मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप; आज प्रसारित होणार शेवटचा भाग
“रिग , कॅमेरा , आणि घाटातला प्रवास।… त्यात घाटात गाडी सांभाळायची, संवाद म्हणायचे, इमोशन्स सांभाळायच्या, रस्त्यावरचं लक्ष ढळू द्यायचं नाही… ही तारेवरची कसरत होती. सुरुवातीला जरा भीती वाटली पण नंतर मजा यायला लागली. भीतीची भावना पार केली तरच अनुभव गाठीशी गोळा होतात. नाहीतर आपण तिथेच राहतो, नाही का…?,” असं मधुराणीनं लिहीलं आहे.
हेही वाचा – “सुप्रिया ताई…” दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…
हेही वाचा – “मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे”, कोकण हार्टेड गर्ल स्पष्टच बोलली; म्हणाली…
मधुराणीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “एवढा उत्कृष्ट अभिनय करणं तेही एवढी काळजी घेऊन खायची गोष्ट नाही…” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “खूप छान जमलंय तुला सगळंच…” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “अगदी खरं आहे. प्रत्येकाला गाडी चालवता आलीच पाहिजे.”
हेही वाचा – ‘ताली’ सीरिजला एक महिना पूर्ण, छोट्या गौरी सावंतनं सादर केली अप्रतिम कलाकृती, व्हिडीओनं वेधलं लक्ष
दरम्यान, सध्या मालिकेत मधुराणी म्हणजे अरुंधती व आशुतोष हनीमूनला निघाले आहेत. त्यामुळे येत्या काळात अरुंधती व आशुतोषचे रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहेत.