‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते. सध्या मालिकेत ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मिहीर-अरुंधती आणि अनिरुद्ध-संजना या दोन जोड्यांमध्ये चुरस रंगली आहे. या विशेष भागाच्या निमित्ताने ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार विविध एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि अभिनेता ऋषी सक्सेनाने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी मधुराणीने सासऱ्यांकडून स्वयंपाक शिकल्याचा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुराणीला विचारलं की, तुझा आवडता पदार्थ कोणता? जो पदार्थ तू आईकडून शिकली आहेस आणि जो तुला उत्तम जमतोय… हा प्रश्न ऐकताच अभिनेत्री हसू लागली. तिला तिचं हसू अनावर झालं. त्यानंतर मधुराणी म्हणाली, “मी माझ्या आईसमोर कधीही कुठलाही पदार्थ शिकायला उभी राहिलेली नाही. मी खरंच सांगतेय. मला माझ्या सासऱ्यांनी स्वयंपाक शिकवला आहे. मी त्यांच्याकडून स्वयंपाक शिकले. कारण त्यांनी पत्नी गेल्यानंतर तूप कडवण्यापासून सगळं स्वतः शिकून केलं. तेव्हा युट्यूब वगैरे काहीही नव्हतं. त्यांनी आजूबाजूच्या बायकांना भेटून रेसिपी उतरवून स्वयंपाक करायला शिकले. त्यांच्यापाशी मी उभं राहून स्वयंपाक शिकले. आजही मला माशाची आमटी बनवता येत नाही. मी आईकडून मी काहीच शिकले नाही. पण ती खूप छान सुगरण आहे.”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरे थिरकले शाहरुख-काजोलच्या गाण्यावर; व्हिडीओ पाहिलात का?

पुढे मधुराणी म्हणाली, “मी माझ्या करिअर, वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये इतकी व्यग्र होते की, आईकडून स्वयंपाक शिकायचं राहून गेलं. तिने मला कधी असं म्हटलं नाही, हे शिकून घे, ते शिकून घे. हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. तिला माहितीये, वेळ पडल्यावर ती शिकले. पण आमच्याकडे उलट आहे. माझ्या मुलीला खूप स्वयंपाकाची आवड आहे. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतात. ती मोमोज करते, पिझ्झा करते. ती स्वयंपाक करण्यात खूप उत्साही आहे. शाळेतूनही आल्यावर एखादा पदार्थ युट्यूबवर शोधून ती बनवते. तिला खूप आवड आहे. मला ती करून घालते.”

हेही वाचा – Video: धर्मासाठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सना खानने वर्षभरानंतर लेकाची दाखवली पहिली झलक, पाहा गोंडस तारिक जमीलचा व्हिडीओ

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेना मिहीर शर्माच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मिहीर हा उत्तम शेफ दाखवण्यात आा आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवण्यासाठी आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar taught cooking not by her mother but by her father in law pps