अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत तिनं साकारलेल्या अरुंधतीची अजूनही चर्चा होतं असते. सध्या मधुराणी रंगभूमीवर पाहायला मिळत आहे. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकात ती काम करत आहे. तिच्या या नाटकाला रसिक प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला मधुराणी नवनवीन फोटोशूट करताना दिसत आहे. नुकतंच तिनं नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्याची चर्चा रंगली आहे.

“Why only the Summer be Hottttt?”, असं कॅप्शन लिहित मधुराणी प्रभुलकरने नवं फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यामध्ये मधुराणीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. पांढर शर्ट आणि मोकळे केस अशा लूकमध्ये ती दिसत आहे. त्यात तिच्या मादक अदाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मधुराणीचं हे हॉट फोटोशूट काही जणांना आवडलं असलं तरी काहींना खटकलं आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

“आई अशी काय करतेय?”, “वाव”, “हॉट, बोल्ड अँड ब्युटिफुल”, “मराठीतली सेक्सी विद्या बालन”, “खूप सुंदर”, “तुमच्या व्यक्तिरेखेला शोभत नाही”, अशा नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “कशाला? चुकीच्या प्रवाहात वाहायलाच हवे का? तुमच्या सारख्या काही बोटांवर मोजता येतील अशा अभिनेत्रींकडे पाहून सात्विक कलेबद्दल आमची आस टिकून आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ताई एक विनंती करायची होती, प्लीज असे फोटोशूट निदान तू तरी नको करत जाऊ. तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे, तुम्ही हवं ते करू शकता, आम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही हे सगळं बरोबर आहे. पण, काही व्यक्ती असतात ज्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा असतात. जे आपल्याला आपल्या घरचे वाटतात. त्यातलीच तू एक आहेस.”

तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, जशी होतीस तशीच चांगली होती. हे शोभत नाही. तसंच चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “कुणीतरी अनिरुद्धला लवकर पाठला.” पाचव्या नेटकऱ्याने लिहिलं की, “आई अशी काय करते? खरंच या फोटोशूटची गरज आहे का? मान्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण, कधीतरी मनालाही विचारून बघावं. बघ पटत आहे का? कुठेतरी सर्वांच्या मनात एक चांगली प्रतिमा तयार झाली आहे. मग हे कशासाठी?”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकासंपल्यानंतर मधुराणी प्रभुलकरची ‘आई आणि बाबा रिटायर होतं आहेत’ मालिकेत एन्ट्री झाली होती. स्वीटी आणि मकरंद लग्नात मधुराणी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता मधुराणी ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ नाटकात दिसत आहे.