‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचे शूटिंग संपल्याचे कलाकारांच्या पोस्टमधून पाहायला मिळत आहे. गेली पाच वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेली पाच वर्षे सतत काम केल्याने या मालिकेतील कलाकारदेखील या सगळ्यांबरोबर जोडले गेले होते. आता विविध मुलाखती, सोशल मीडियावर शेअर केलेले पोस्ट यांमधून कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत अभिषेक देशमुखची भूमिका साकारलेला अभिनेता निरंजन कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता निरंजन कुलकर्णीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “एवढे वर्ष मला सांभाळून घेतलेल्या या मेकअप रूमला निरोप देताना खूप जड जात होतं. माझी ही छोटीशी रूम मनात खूप मोठी जागा करून गेली. आम्ही इथे केलेली मजा, मस्ती, आठवणी, तालीम आणि माझा रोजचा जेवणाचा ठरलेला एक कोपरा कायम स्मरणात राहतील. खूप खूप आभार आमच्या समृद्धी बंगल्याचे. (बाय बाय अभि दादा काळजी घे)”, असे लिहित त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इन्स्टाग्राम

निरंजन कुलकर्णीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “किती गोड निरंजन”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “अभिला गुड बाय म्हणताना आम्हालासुद्धा खूप जड जड झालंय, पण ते म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन; त्यामुळे भविष्यात संपूर्ण टीमकडून आणखी चांगले काम पाहण्यासाठी उत्सुक आहोत.” “यादें याद आती है, आई कुठे काय करते हा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “आता नवीन प्रवासाकडे वाटचाल, खूप खूप शुभेच्छा”, “ऑल द बेस्ट, एक नवीन सुरुवात करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कुठेतरी थांबावं लागतं.”

निरंजन कुलकर्णीने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिषेक देशमुखची भूमिका निभावली होती. जी कधी गोड, कधी तिखट, आंबट-गोड, कधी भोळी वाटणारी तर कधी स्वार्थी वाटणारी अशी होती. अभिषेक इतरांशी कसाही वागला तरीही त्याचे भावंडांवरचे प्रेम हे कायम नि:स्वार्थ असल्याचे पाहायला मिळाले. अभिषेकच्या भूमिकेला इतरांच्या भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

हेही वाचा: “महिलेने मला तिच्या कडेवर असलेलं बाळ…”, मधुराणी प्रभुलकरने सांगितला चाहतीचा मजेशीर किस्सा, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेत दिसलेले कलाकार कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.