काही कलाकार हे जितके त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तितकेच त्यांच्या फिटनेससाठीदेखील ओळखले जातात. लोकप्रिय मराठी अभिनेते मिलिंद गवळी हे त्यापैकीच एक आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांतून मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनयाबरोबरच त्यांच्या फिटनेसचीदेखील अनेकदा चर्चा होताना दिसते. आता एका मुलाखतीत मिलिंद गवळी यांनी तंदुरुस्त राहणे किती महत्त्वाचे याबाबत वक्तव्य केले आहे.

तंदुरूस्त राहण्याचे महत्व सांगताना काय म्हणाले मिलिंद गवळी?

मिलिंद गवळी यांनी नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना त्यांच्या फिटनेसचे रहस्य विचारण्यात आले. त्यावर बोलताना मिलिंद गवळी यांनी त्यांची मुलगी मिथिला ही ट्रेनर, कोच असल्याचे म्हटले. याविषयी अधिक बोलताना त्यांनी म्हटले, “मिथिला ही ट्रेनर आहे. तिनं हे व्यवसाय क्षेत्र निवडलं आहे. तिनं तीन-चार डिग्री घेतल्या आहेत. इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये एम.ए. केलं. आयएएस, आयपीएसची तयारीदेखील केली. हे करत असताना तिला थायरॉइडचा थोडा त्रास झाला. त्यानंतर तिनं फिजिकल ट्रेनिंग करायला सुरुवात केली. गोळ्या-औषधांनी बरी होण्याऐवजी तिनं स्वत:ला फिट करण्यासाठी फिजिकल ट्रेनिंग घेतले. हे करता करता तिच्या लक्षात आलं की, आता हे आयुष्यभर करायचं आहे. तर तिनं ते प्रोफेशन म्हणून निवडलं. ती कोच असल्यामुळे तिचं तर मी ऐकतोच. पण, तिला हे ट्रेन करणारा मीच आहे. सकाळी लवकर उठून बीचवर पळायला नेणारा मीच होतो आणि फिजिकल ट्रेनिंगची मला फार पूर्वीपासून सवय होती. खेळाची आवड होती.”

Chhagan Bhujbal
नाराज भुजबळांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा, पुढची योजना ठरली? स्वतः माहिती देत म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bigg Boss 18 Shrutika Arjun is the new time god in salman khan show
Bigg Boss 18: विवियन डिसेना, करणवीर मेहरा नाही तर ‘हा’ सदस्य झाला नवा ‘टाइम गॉड’; दोन आठवडे नॉमिनेशनपासून राहणार सुरक्षित
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Ravichandran Ashwin Retirement after Gaaba Test
R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती, गाबा कसोटीनंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

“शाळेतील वर्गात बसून अभ्यास करण्यापेक्षा शाळेच्या बाहेर उनाडक्या करणं हा माझा आवडता छंद होता. मला कालांतरानं लक्षात आलं की, ज्या क्षेत्रात मी आहे त्या अभिनय क्षेत्रात एक विशिष्ट प्रकारचा फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. मी बऱ्याचशा मराठी कलाकारांना बघितलं, तर ते कुठेही फाइटचं ट्रेनिंग घेत नाहीत आणि सिनेमामध्ये अचानक फाइटचा सीक्वेन्स आला की, त्यांची दमछाक होते.”

“मालिकांसाठी एक वेगळा फिटनेस लागतो. तिथे काही फाइट सीक्वेन्स नसतात. पण, १४ तासांचं सलग काम करणं, याच्यासाठी तुम्हाला ऊर्जा लागते. बऱ्याचशा मालिकांतील कलाकारांकडे ती ऊर्जा नसते. सातत्यानं तुम्हाला ते करायचं असेल. १४ तास तेवढ्याच ऊर्जेनं ते करावं लागतं. नवीन पोरं मी बघितली, त्यांची ऊर्जा संध्याकाळी ६-७ वाजता कमी होते. ते ढेपाळतात. पुढे दहा-साडेदहा वाजेपर्यंत जर दोन सीन करायचे असतील, तर ते खूप रडत-कुढत, कंटाळत करतात. गेल्या पाच वर्षांत सेटवर आजारी पडण्याचं प्रमाणदेखील जास्त होतं. त्यामुळे फिजिकल ट्रेनिंग ही त्या प्रोफेशनची गरज आहे, असं मला वाटतं. अभिनयासाठी एक शारीरिक तंदुरुस्तीचे मानक (स्टॅण्डर्ड फिजिकल फिटनेस) असणे गरजेची आहे. आपल्याकडे शारीरिक तंदुरुस्ती तर लांबच राहिली. मानसिक तंदुरुस्तीही (मेंटल फिटनेस) एक मोठी समस्या आहे. त्याबाबत कोणी विचार करत नाही. शारीरिक- मानसिक तंदुरूस्ती नाही, त्यामुळे जर सातत्याने तुम्ही अनिरुद्ध ही भूमिका साकारत असाल, तर पाच वर्षांनंतर तुम्हाला वेड कसं लागलं नाही हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावरदेखील काम करावं लागेल. त्यामुळे फिटनेस हा माझा आवडता विषय आहे. मला तरुण राहायचे आहे. त्यासाठी मी सातत्याने योगा, प्राणायाम करतो”, असे म्हणत मिलिंद गवळी यांनी फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

हेही वाचा: “१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते नुकतेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करताना दिसत होते. या मालिकेत त्यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारली होती. गेली पाच वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. काही दिवसांपू्र्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

Story img Loader