‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी हे नेहमी चर्चेत असतात. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील येणारे प्रत्येक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहीलं आहे की, केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे. पण असं मिलिंद गवळी का म्हणाले? जाणून घ्या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: काजोलचा व्हिडिओ काढताना पडला पापाराझी; अभिनेत्रीच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

अभिनेते मिलिंद गवळी यांनी नवा हेअर कट केला आहे. त्याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहीलं, “केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे. त्यामध्ये सातत्य राखणे सुद्धा कठीण काम असतं. मालिका सुरू असताना केस कधी कापायचे? हा खूप मोठा प्रश्न असतो. लागोपाठ सीन्स (कंटिन्यूअस सीन्स) चालू असतात त्याच्यामध्येच जर तुम्ही केस कापले तर तो एक मोठा जर्क (Jerk) दिसतो. मी ज्यावेळेला सिनेमे करायचो त्यावेळेला तर एक हेअर स्टाइल (Hairstyle) ही मला जवळजवळ वर्षभर तरी ठेवावी लागायची. कारण सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत ती केसांची स्टाइल बदलता यायची नाही. त्यामुळे फक्त केस ट्रीम करत राहणे एवढेच करता यायचं आणि मग खूप मोठा प्रश्न पडायचा की केस कापणाऱ्याला आपण काय सांगायचं की आपल्याला कसे केस कापून हवे आहेत. त्यामुळे बरीच वर्ष मी माझे माझे केस ट्रीम करायचो. आता स्वतःचे केस कापण्याचा इतका सराव झाला आहे की, लॉकडाऊनमध्ये दर पंधरा-वीस दिवसांनी मी माझेच केस ट्रीम करत बसायचो. काही चुकलं तर भीतीच नसायची. तेव्हा केस कापायचा माझा छान सराव झाला. पण गेल्या तीन वर्षांपासून मी ठाण्यात सागरकडे केस कापतो आहे. या तीन वर्षात मी त्याच्याकडे फक्त सहा वेळा गेलो आहे. मधल्या वेळेला मी माझे माझे केस स्वतः ट्रीम करतो.”

हेही वाचा – “कॅमेराच्या मॉनिटवर साप अन्…” अभिनेता अमेय वाघचा अंदमानमधील चित्रीकरणाचा अनुभव, म्हणाला…

पुढे मिलिंद यांनी लिहिलं की, “पूर्वी केसांच्या बाबतीत मी खूपच पर्टिक्युलर असायचो. केस कापायला अगदी दोन हजार, अडीच हजार रुपये पण द्यायचो. पण आता इतका गोंधळलेला राहिलो नाहीये. घरी आपले केस कापायला बोलवण्याच्या ऐवजी मला स्वतः सलोनमध्ये जाऊन केस कापायला आजही छान वाटतं. सागरला अनिरुद्ध या भूमिकेच्या केसांची स्टाइल इतकी चांगली पाठ झाली आहे की, मला त्याला काहीच सांगावं लागत नाही. जाऊन फक्त खुर्चीत बसायचं आणि छानशी कॉफी पीत आपले केस कापून घ्यायचे. दोन-तीन महिन्यात हा एक छान अनुभव असतो.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

हेही वाचा – “हिंदू हा धर्म नाही, ही जगण्याची…,” अध्यात्माविषयी बोलताना मिलिंद गवळींचं वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेही झळकले आहेत. सध्या त्यांची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali share video of new hair cut pps
Show comments