मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मराठीसह हिंदी मालिकेतही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील त्यांची भूमिका नकारात्मक असली तरी ती प्रेक्षकांना मात्र खूप आवडते. असे हे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी आध्यात्मिक आहेत का? कधी नवस, उपवास करतात? या सर्व प्रश्नांची उत्तर त्यांनी ‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमादरम्यान दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: भारत-पाकिस्तान सामान्यादरम्यान अरिजित सिंहने मागितला अनुष्का शर्माकडे फोटो; अभिनेत्रीने दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

नवस, उपवास आणि अध्यात्माविषयी बोलताना मिलिंद गवळी म्हणाले, “मी नवस, उपवास वगैरे करत नाही. कोणत्याही ग्रंथामध्ये उपवास करा, असं करा, तसं करा नाही सांगितलंय. पण माझा अध्यात्मावर विश्वास आहे. मी आध्यात्मिकच आहे. मी परमेश्वराला मानतो. पण परमेश्वर म्हणजे कोण? याची संकल्पना अजूनही लोकांना कळलेली नाहीये. पण मी बुद्धिस्टपण आहे, हिंदू पण आहे, मी ख्रिश्चन पण आहे. माणसाने जे जातपात, धर्म तयार केलेत. त्याच्या पलीकडे ज्यांनी माणसाला तयार केलं, सृष्टीला तयार केलं, विश्व तयार केलं, तो परमेश्वर. त्याला रंग, रुप, जातपात काहीच नाही. तुम्हाला त्याच्याकडे जाण्यासाठी लोकांनीच मार्ग काढले आहेत. मग तुम्ही मुसलमान व्हा, बुद्धिस्ट व्हा किंवा हिंदू व्हा.”

हेही वाचा – MTV Roadies 19: यंदाही प्रिन्स नरुलाच्या पदरी अपयश; रिया चक्रवर्तीच्या गँगमधील वाशु जैनने मारली बाजी

“खरंतर हिंदू हा धर्म नाही, ही जगण्याची पद्धत आहे. त्यामुळे मी नशीबाने हिंदुस्थानात जन्माला आलो, मी भारतात जन्माला आलो. म्हणून मी या संस्कृतीत वाढलो आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो, मी हिंदू म्हणून जन्माला आलो. जर कुठल्या अरब देशात जन्माला आलो असतो तर अल्लाहाच्या मार्फत तिकडे पोहोचलो असतो. तो काही पोहोचणार नाही. त्याला काही परमेश्वर कळणार नाही असं नाहीये. प्रत्येक माणसांमध्ये परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याला तयार केलं आहे. त्यामुळे परमेश्वराचा अंश त्याच्यात आहे. म्हणजेच तोच पक्षी, प्राणी, सृष्टी, जीवात्मा आहे. ही पृथ्वी परमेश्वराची संकल्पना आहे. त्यामुळे मी आध्यात्मिक आहे,” असं मिलिंद गवळी म्हणाले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali talk about spirituality and hinduism pps
Show comments