‘आई कुठे काय करते’ अभिनेत्री राधा सागरकडे काही दिवसांपूर्वी गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता तिने आणखी एक बातमी शेअर केली आहे. तिने तिचा पती सागरबरोबर मिळून नुकताच नवीन फ्लॅट खरेदी केला आहे आणि तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली. राधाचं स्वतःचं घर खरेदी करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.
राधाने पुण्यात नवीन घर विकत घेतलं आहे. तिने चाहत्यांबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडीओत तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. “स्वप्न पूर्ण झालंय, होम स्वीट होम”, असं तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करून चाहते शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अंकिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर लवकरच आई होणार आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच चाहत्यांना गोड बातमी दिली होती. त्यानंतर आता तिने स्वतःचं घरही घेतलं आहे.
राधाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती यापूर्वी ‘ आई कुठे काय करते’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांमध्ये झळकली होती. या पात्रांमधून ती घराघरात पोहोचली. मात्र गरोदरपणामुळे तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे.