Aai Kuthe Kay Karte: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा शेवटचा भाग ३० नोव्हेंबरला प्रसारित होणार आहे. अखेर पाच वर्षांचा प्रवास आता संपणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर आतापर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील विशाखा म्हणजेच अभिनेत्री पुनम चांदोरकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शेवटचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं. यावेळी केक कापून शेवटचा दिवस साजरा करण्यात आला. तसंच मालिकेतील कलाकारांना सन्मानचिन्ह देण्यात आलं. या सन्मानचिन्हाचा फोटो शेअर करून पुनम चांदोरकरने पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री पुनम चांदोरकरची पोस्ट वाचा
विशाखा काळजी घे…पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास काल पूर्ण झाला (थांबला नाही म्हणणार..) इथून पुढे आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात…जिची कुठेही शाखा नाही अशी ‘विशाखा’ असं गमतीमध्ये रवी सर, अप्पा बोलायचे. ‘आई कुठे काय करते’चा काल शूटिंगचा शेवटचा दिवस…रात्री गणपती बाप्पा मोरया असे जेव्हा रवी सर बोलले तेव्हा पहिल्यांदा काहीतरी खोलवर जाणवलं…ही पॅकअपची घाई, हा आवाज, ही वास्तू, स्क्रिप्ट, क्लोजसाठी मेकअप टचअप करून रेडी होणं, कॉस्च्युम, तयारी आणि बरंच…
काही काळ समृद्धी बंगल्यात थांबले…आणि मग पहिला दिवस ते आजचा दिवस सगळं डोळ्यासमोरून येऊन गेलं…या मालिकेने, समृद्धीने कलाकार म्हणून माणूस म्हणून खरंच खूप समृद्ध केलं…शेवटचं तिथे मस्तक टेकवलं आणि वास्तूचा निरोप घेतला..आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता वर्तक, मुग्धा गोडबोले याच्या लेखणीतून विशाखा तयार झाली आणि मग रवी सर, सुबोध सर, तुषार विचारे यांच्या मार्गदर्शनाने तिने आकार घेतला…अगदी कुठेही गेलं तरी विशाखा या नावाने सगळे ओळखतात…लॉकडाऊनमध्ये तर डोळे आणि आवाजावरूनही तोंडावर मास्क असतानाही ‘विशाखा आत्या’ ही हाक आली की समाधानाने भरून पावत होते.
या प्रोजेक्टसाठी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी तुमच्या प्रोजेक्ट हेड नमिता वर्तक आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले, चित्रा पाटणकर, आमचे निर्माते राजन शाही यांचे मनापासून आभार. तसेच स्टार प्रवाह, सतीश राजवाडे सर, आमचे कॅप्टन ऑफ द शिप रवी सर सुबोध बरे, तुषार विचारे, तसेच कधी काही प्रॉब्लेम सांगितला तर लगेच तो सॉल करणारा आमचा हक्काचा रोहित दादा, आमचे डीओपी राजू देसाई, आमचे इपी आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे तसेच सर्व कलाकारांचे मी आभार मानते. ज्यांनी मला या सर्व प्रवासात सांभाळून घेतलं आणि कांगोरे असलेले ‘आई कुठे काय करते’ हे नेहमी मनाच्या कोपऱ्यात आढळ स्थानावर राहिल आणि या सगळ्यात विशाखा या कॅरेक्टरवर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम करत राहा तुमचा आशीर्वाद असू दे. तुमचे मी खूप खूप आभारी आहे.
हेही वाचा – Video: केळवणासाठीची रेश्मा शिंदेची हटके एन्ट्री पाहिलीत का? आशुतोष गोखलेने व्हिडीओ केला शेअर
हेही वाचा – Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार, ‘त्या’ व्हिडीओमुळे रंगली चर्चा
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.