‘स्टार प्रवाह’वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तसंच मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपापली पात्र उत्कृष्टरित्या निभावल्यामुळे प्रेक्षकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या या मालिकेत झळकलेल्या एका अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने नुकतीच ही पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ही झळकलेली अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. राधिका मालिकेत देविकाच्या भूमिकेत झळकली होती; जी अरुंधतीची मैत्रीण दाखवली होती. नुकतंच राधिकाने सोशल मीडियावर कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर करत एक प्रसंग सांगितला.

हेही वाचा – “हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला…”, प्रसाद ओकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेत्री राधिका देशपांडेने फोटो शेअर करत सांगितलं, “अगदी ठेवणीतला असा नाही, जेमतेम काल परवा काढलेला एवढाच जुना. “आई मला गजरा लावून दे” सांगणारी अंतरा मला आवडली. फोटो बघून म्हणाली, “टिकली हवी होती”. हे ऐकून तिच्या आईचे कान तृप्त झाले. मेरा देश बदल रहा है.”

हेही वाचा – ‘तू चाल पुढं’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

दरम्यान, राधिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या शरद पोंक्षे यांच्या ‘नथुराम गोडसे’ या नाटकात काम करत आहे. सध्या या नाटकाचे अखेरचे प्रयोग सुरू आहेत. २६ जानेवारीला शेवटचा प्रयोग पार पडणार आहे.