‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसलेने पुन्हा एकदा आलिशान गाडी खरेदी केली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात रुपालीचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. ते म्हणजे तिने स्वतःचं हक्काचं घर घेतलं. या नव्या घराची वास्तुशांती तिने पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात घातली होती. रुपालीच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर रुपालीने आलिशान गाडी घेतली. या गाडीला दोन महिने पूर्ण होताच तिने आणखी एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. ही आनंदी बातमी तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रुपाली भोसलेने मर्सिडीज बेंझ ही गाडी खरेदी केली आहे. या नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत तिने सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. रुपालीने लिहिलं की, एक दिवस मी तुझी मालकीण होईन ते आज यासाठीच हे सर्व सुरू झालं…तुम्ही आयुष्यात फक्त स्वप्नं पाहून नका, तर ती स्वप्नं जगा. त्या स्वप्नांवर प्रेम करा आणि जोखीम घ्या. कितीही कठीण असलं तरीही स्वतःला वचन द्या. तुम्ही तुमची स्वप्नं कधीच सोडू नका. तुम्ही काय करू शकत नाही हे स्वतःला सांगू नका. तर तुम्ही काय करू शकता हे स्वतःला सांगा. वेलकम बेबी…चल आता एकत्र पुढे प्रगती करत जाऊ. राधे राधे.

हेही वाचा – Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

या व्हिडीओमध्ये, रुपाली आपल्या कुटुंबियांबरोबर नव्या गाडीचं स्वागत करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री गाडीची पूजा करताना आणि केक कापताना दिसत आहे. या खास क्षणासाठी शोरुम रुपालीच्या फोटोंनी आणि फुग्यांनी सजवलेलं पाहायला मिळत आहे. ‘कारवाले डॉटकॉम’च्या मते रुपालीने खरेदी केलेल्या मर्सिडीज बेंझची किंमत ५० लाखांहून अधिक आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: “मला ती खूप आवडते…”, वर्षा उसगांवकरांनी शिल्पा शिरोडकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीच्या मते ‘हा’ सदस्य ट्रॉफीच्या जवळ

दरम्यान, रुपाली भोसलेल्या शेअर केलेल्या नव्या गाडीच्या व्हिडीओवर बऱ्याच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, साक्षी गांधी, गिरीजा प्रभु, रुतुजा देशमुख, शुभी शर्मा, सुकन्या काळण यांनी रुपालीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosale bought a new mercedes benz pps