‘बड़ी दूर से आये है’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते’ लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिने साकारलेली संजनाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. पूर्वी संजना ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती. पण काही काळानंतर दिपालीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि तिच्या जागी रुपालीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एन्ट्री घेतली. दिपाली प्रमाणे तितक्याच ताकदीने रुपाली ही भूमिका पेलेली. यासाठी तिला सर्वोकृष्ट खलनायिकेचा देखील पुरस्कार मिळाला. अशा या लोकप्रिय खलनायिकेने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. काल, (२९ जून) या आलिशान घराची वास्तुशांती पारंपरिक पद्धतीने पार पडली. त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले आहेत.

प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला जशा संघर्ष असतो तसाच रुपाली भोसलेच्याही आयुष्यात होता. अनेक अडचणींचा सामना करत ती आज इथंवर पोहोचली आहे. कित्येक वर्षांपासून रुपाली अभिनय क्षेत्रात अविरत काम करत आहे. त्याच मेहनतीचं फळ तिला मिळाल असून अखेर तिने स्वतःच्या हक्काच्या घरात आपल्या कुटुंबासह प्रवेश केला आहे. काल, रुपालीने जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने वास्तुशांती केली. यावेळी अभिनेता अभिषेक देशमुख, गौरी कुलकर्णी, सुशांत शेलार, अभिजीत केळकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रुपालीच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमातील भजनात सुशांत दंग झालेला पाहायला मिळाला.

janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Ashwini Mahangade
“तरीही हिमतीने रणांगणावर…”, अभिनेत्री अश्विनी महांगडे फोटो शेअर करीत काय म्हणाली?
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali parab share special post of mangala movie
“…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं…”
Devendra Fadnavis Nagpur, Devendra Fadnavis Nagpur Welcome , Nagpur Winter Session,
Devendra Fadnavis : “पूर्वी जमिनीवर होतो यापुढेही जमिनीवर…”, देवाभाऊंचे गृहशहरात जल्लोषात स्वागत
Loksatta lokrang Shyam Benegal A Person A Director book written by Dr Savita Nayakmohite published
स्त्रीत्वाची ताकद जाणणारा चित्रकर्ता
radhika apte shares first pic with her new born baby
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे झाली आई, फोटो शेअर करून दाखवली बाळाची पहिली झलक

हेही वाचा – Video: “विराटने किंग कोहली का आहे हे दाखवलं”, सलील कुलकर्णींची टीम इंडियाला शाबासकी, म्हणाले, “पंड्या, बुमराह जादूगार…”

‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना रुपाली भोसले म्हणाली, “खूप छान वाटतंय. सकाळी जेव्हा पूजा सुरू झाली तेव्हा मला खरंच राहवलं नाही. सगळा तो प्रवास आठवला. जेव्हा आपलं कधी होईल तेव्हापासून ते आता झालंय आणि आई-बाबांना पूजा करताना बघून सगळा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. त्यामुळे डोळे पाणावले. पण फक्त डोळे पाणावले नाही तर हुंदका देऊन रडावंस वाटतं होतं, इतके पाणावले होते. पण अखेर तो क्षण आलेला आहे. आई-बाबा त्यांच्या हक्काच्या घरात आलेले आहेत. छान वाटतंय.”

हेही वाचा – Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा आणि रुपालीमध्ये अभिनयाचं चॅलेंज, पाहा व्हिडीओ

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून रुपाली भोसले घराच्या इंटेरिअरवर काम करत होती. घराचा प्रत्येक कानाकोपरा तिनं स्वतःच्या स्टाइलनं सजवला आहे. हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे रुपाली खूप आनंदात आहे. तिचं संपूर्ण आलिशान घर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसंच इतर कलाकार मंडळी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Story img Loader