छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसले घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत रुपालीने खलनायिका संजनाची भूमिका साकारली आहे. मराठी मालिकांप्रमाणे रुपालीने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी ती इन्स्टाग्रामवर शेअर करते. सध्या रुपालीने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री रुपाली भोसले आणि बॉलीवूडच्या ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांची ग्रेट भेट झाली. या भेटीचा सुंदर अनुभव तिने एका पोस्टद्वारे शेअर केला आहे. एवढंच नव्हे तर हेमाजींनी पहिल्याच भेटीत रुपालीचं भरभरून कौतुक देखील केलं आहे.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम सायली आणि प्रियामध्ये ‘असं’ आहे ऑफस्क्रीन नातं! जुई गडकरीने शेअर केली खास पोस्ट…
रुपाली भोसले पोस्टमध्ये लिहिते, “ड्रीमगर्ल…त्यांचं सौंदर्य व सुंदर स्वभाव पाहून मी खरंच नि:शब्द झाले. त्यांना रंगभूमीवर लाइव्ह सादरीकरण करताना पाहणं…यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता? खूपचं भारी वाटलं. ज्यावेळी त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘तू खूप सुंदर आहेस आणि तेवढंच सुंदर तू नृत्य केलंस.’ प्रत्यक्ष त्यांच्याकडून माझं कौतुक ऐकलं हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. तुम्ही माझं कौतुक केलंत, मला वेळ दिलात याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे हेमा मॅम! तुम्हाला खूप प्रेम”
हेही वाचा : “तुझं स्थान…”, प्रथमेश परबच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केली रोमँटिक पोस्ट
दरम्यान, रुपाली आणि हेमाजींचा एकत्र फोटो पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षावर केला आहे. “फक्त कमाल…”, “खूप सुंदर रुपाली ताई…”, “खूप लकी आहेस…सुंदर रुपाली” अशा असंख्य कमेंट्स रुपालीच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.